ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्र सरकार कुणाला घाबरत नाही, बिहार निवडणुकीसाठी सुशांतच्या आत्महत्येवरुन राजकारण : रोहित पवार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 03, 2020 01:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्र सरकार कुणाला घाबरत नाही, बिहार निवडणुकीसाठी सुशांतच्या आत्महत्येवरुन राजकारण : रोहित पवार

शहर : मुंबई

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी जोरदार राजकारण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसंच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात भाजपवर राजकारण करत असल्याचा आरोप केला. तसेच महाराष्ट्रात सरकार कोणत्याही पक्षाचे असो, महाराष्ट्र सरकार कधीही कुणाला घाबरत नाही, असंही स्पष्टपणे सांगितलं.

रोहित पवार म्हणाले, “महाराष्ट्रात असलेलं कोणत्याही पक्षाचं सरकार कुणालाही घाबरत नाही हे आधी सर्वांनी लक्षात घ्यावं. शासकीय व्यक्ती महाराष्ट्रात येते. त्या ठिकाणी शासन-शासन यामध्ये पाळावयाचा प्रोटोकॉल पाळला जावा असं वाटतं. मात्र, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या खोलात जावंच लागेल. मुंबई पोलीस सक्षम आहेत. ते नक्कीच या प्रकरणाचा छडा लावतील.”

सध्या बिहारमध्ये विधानसभा निवडणूक येत आहे. त्यामुळे बिहारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा वेगळ्या अर्थाने पेटवला जातो आहे,” असंही रोहित पवार यांनी सांगितलं.दरम्यान, रोहित पवार यांनी याआधीच एक सविस्तर फेसबूक पोस्ट करत सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावर आपली भूमिका मांडली होती. रोहित पवार म्हणाले होते, “अभिनेता सुशांत सिंहच्या बाबतीत घडलेली ही घटना सर्वांनाच चक्रावणारी मनाला चुटपूट लावणारी आहे. या घटनेला आता दीड महिना झालाय. सुरुवातीला मुंबई पोलीस आणि चित्रपटसृष्टीपुरतं मर्यादित असलेलं हे प्रकरण आता हळूहळू राजकीय रंग घेतंय की काय अशी शंका येऊ लागलीय. सुशांत गुणी अभिनेता होता का? तर निश्चितच होता. त्याची आत्महत्या आपल्या सर्वांसाठीच क्लेशदायक आहे. त्यामुळं या घटनेत कुणी दोषी असेल तर त्याचा निष्पक्षपणे तपास व्हायलाच हवा.”

गुणवत्तेमध्ये जगात ओळख असणारे मुंबई पोलीस तपास करण्यास सक्षम

गुणवत्तेमध्ये जगात ज्या ठराविक पोलिसांचं नावं घेतलं जातं त्यात मुंबई पोलिसांचाही समावेश आहे. त्यामुळं मुंबई पोलीस या घटनेचा सखोल तपास करतील, यात कोणतीही शंका नाही. या घटनेत चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांची त्यांनी आतापर्यंत चौकशीही केलीय. त्यामुळं मुंबई पोलीस हे सक्षम असून त्यांच्याकडून योग्य तपास होऊन याप्रकरणी न्याय मिळेल, असा विश्वास आहे. पण दरम्यानच्या काळात सुशांत सिंहच्या वडलांनी दिलेल्या तक्रारीनुसार बिहारमध्येही याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि लगोलग बिहार पोलीस या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मुंबईतही दाखल झाले,” असं रोहित पवार यांनी नमूद केलं.

बिहार पोलिसांची कार्यतत्परता पाहून तेथील गुन्हेगारी कमी होईल अशी अपेक्षा

रोहित पवार म्हणाले, “वास्तविक, बिहार पोलीस इतके कार्यतत्पर असतील हे मला माहित नव्हतं. तिथल्या कायदा सुव्यवस्थेबाबत वृत्तपत्रातून किंवा टिव्हीवरुन ऐकलेल्या-वाचलेल्या बातम्यांमधून ते इतके दक्ष असतील असं वाटलं नव्हतं. की केवळ याच घटनेपुरती त्यांनी तत्परता दाखवली, हे माहीत नाही. पण असो. खरंच ते इतके कर्तव्यदक्ष असतील तर त्याचं स्वागतच करायला हवं आणि यामुळं बिहारमधील गुन्हेगारीचं प्रमाणही कमी होईल, अशी अशी अपेक्षा करायलाही हरकत नाही. मात्र एका लोकप्रिय अभिनेत्याच्या आत्महत्येचं कुणी राजकारण करत असेल तर ते चुकीचं आहे.”

बिहारमध्ये तोंडावर आलेल्या निवडणुका पाहिल्या तर या घटनेचा कुणीही आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोग करून घेता कामा नये आणि असं कुणी करत असेल तर तो प्रयत्न आपण सर्वांनीच हाणून पाडायला हवा, असंही आवाहन रोहित पवार यांनी केलं.

मागे

मुख्यमंत्र्यांनी बोलवली मुंबई पोलीस आयुक्त, महासंचालक, मुख्य सचिवांची तातडीची बैठक
मुख्यमंत्र्यांनी बोलवली मुंबई पोलीस आयुक्त, महासंचालक, मुख्य सचिवांची तातडीची बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलीस आयुक्त, महासंचालक आणि मुख्य सचिव....

अधिक वाचा

पुढे  

बिहार पोलिसांना चुकीची वागणूक, उद्धव ठाकरेंशी बोला, चिराग पासवान यांची नितीशकुमारांना विनंती
बिहार पोलिसांना चुकीची वागणूक, उद्धव ठाकरेंशी बोला, चिराग पासवान यांची नितीशकुमारांना विनंती

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश द्....

Read more