By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 27, 2019 02:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
विधानभवनात आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. ज्येष्ठ, अनुभवी आमदारांसोबत यावेळी युवा आमदारांनी देखील शपथ घेतली. यामध्ये कर्जत-जामखेडचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांचा देखील समावेश होता. या शपथविधी सोहळ्यात सगळ्यांनी एकाच पद्धतीने शपथ घेतली मात्र रोहित पवारांनी घेतलेली शपथ ही हटके स्टाईलची होती.
शपथ घेताना सर्व आमदारांनी आपलं नाव-वडिलांच नाव- आडनाव यापद्धतीने सुरूवात केली. मात्र रोहित पवारांनी आपलं नाव 'मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार ...' असं घेतलं. शपथविधी सुरू होताच रोहित पवारांनी जी सुरूवात केली त्यामुळे सभागृहातील सगळ्यांच्याच नजरा त्यांच्यावर खिळल्या. रोहित पवारांनी आपल्या आईच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे आपलं वेगळपण अधोरेखित केलं
Thank You @supriya_sule Aatya for your wishes
मागे
अजित पवारांवर योग्यवेळी बोलेन - देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी ५४ आमदारांचे सही असल्याचे पत्र घेऊन भ....
अधिक वाचा