ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आरपीआय कार्यकर्त्याने EVM वर फेकली शाई

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2019 06:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आरपीआय कार्यकर्त्याने EVM वर फेकली शाई

शहर : मुंबई

राज्यभरात सोमवारी विधानसभा निवडणुकीचे मतदान होत आहे. मतदान करण्यासाठी अवघा एक तास उरला असताना ठाण्यातील एका मतदान केंद्रावर ईव्हीएमवर (EVM) शाई फेकण्याची घटना घडली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या एका कार्यकर्ता मतदानासाठी मतदान केंद्रावर आले असता त्याने निवडणूक कर्मचाऱ्यांजवळील शाईची बाटली हिसकावली आणि ईव्हीएमवर शाई फेकली. यावेळी मतदान केंद्रात एकच गोंधळ उडाला. सुनील खांबे असे या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. खांबे यांनी शाई फेकल्यानंतर 'ईव्हीएम मुर्दाबाद'च्या घोषणाही दिल्या.पोलिसांनी सुनील खांबे यांना ताब्यात घेतले.

मिळालेली माहिती अशी की, सुनील खांबे इतर मतदारांप्रमाणेच मतदानासाठी आले. मात्र, त्यांनी अचानक निवडणूक कर्मचाऱ्यांकडून शाईची बाटली हिसकावून ती ईव्हीएम कक्षावर फेकली. त्यामुळे काहीवेळ मतदान कर्मचारी देखील गोंधळले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत खांबे यांना मतदान केंद्राबाहेर काढत ताब्यात घेतले. यावेळी खांबे यांनी 'ईव्हीएम मुर्दाबाद'च्या घोषणाही दिल्या.

EVM मुळे लोकशाही धोक्यात...

'मला फासावर लटकवले तरी चालेल, पण मी ईव्हीएमचा विरोध करत राहणार, असे सुनील खांबे यांनी यावेळी सांगितले आहे. ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएमच्या मदतीने विरोधी पक्षातील मित्रपक्षांना संपवले आहे. तसेच लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी ईव्हीएमला विरोध करावा, असेही आवाहन देखील सुनील खांबे यांनी केले आहे.

मागे

मतदानाच्या दिवशी शिक्षकाचा मृत्यू, बोगस मतदान, 2 गटात राडा
मतदानाच्या दिवशी शिक्षकाचा मृत्यू, बोगस मतदान, 2 गटात राडा

राज्यात आज विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी काही धक्कादायक घटना घडल्याचे उघ....

अधिक वाचा

पुढे  

राज्यात ५५ टक्के मतदान, मुंबईसह पुणे- ठाण्यात निरुत्साह
राज्यात ५५ टक्के मतदान, मुंबईसह पुणे- ठाण्यात निरुत्साह

विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांचा निरुत्साह दिसून आला. राज्यात सायंकाळी ५ व....

Read more