By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 25, 2019 10:19 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष , कामगार नेते व माजी राज्यमंत्री सचिन अहिर हे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठे खिंडार पडल्याचे मानले जात आहे.
सचिन अहिर राष्ट्रीय मिल मजदूर संघांचेही अध्यक्ष आहेत. त्याशिवाय महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या माध्यमातूनही विविध उद्योग व्यवसायात ते कामगारांचे नेतृत्व करीत आहेत. साहजिकच त्यांचे मुंबईत बर्यापैकी वर्चस्व आहे. याचा लाभ शिवसेनेला निश्चितच होईल, अशी चर्चा आहे.
काही महिनापूर्वीच सचिन अहिर राष्ट्रवादी सोडणार असल्याचे वृत झळकले होते. त्यानंतर ही चर्चा थांबली. त्यानंतर लोकसभेची निवडणूकही पार पडली. या निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी मिळेल, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. पण त्यांची निशारा झाली. तेव्हापासूंनच सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीला सोडण्याचा विचार सुरू केला, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी संगितले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सचिन अहिर यांना आपल्या जाळ्यात ओढले.
केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी वेतन संहिता ....
अधिक वाचा