By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 30, 2019 03:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने शनिवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट खासगी कारणासाठी असल्याचे सांगितले जात असले तरी निवडणुकीचे वातावरण पाहता यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. सचिन सकाळी ११ वाजता वरळीतील सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी पोहोचला. यानंतर तब्बल अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाली. मात्र, या चर्चेचा नेमका तपशील अजूनही समजू शकलेला नाही. पवारांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सचिननेही प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले. सचिन तेंडुलकर सध्या काँग्रेसचा राज्यसभेतील खासदार आहे. शरद पवारांचा राजकीय चमत्कार करण्याचा एकूण लौकिक पाहता या भेटीमुळे सर्वांची उत्सुकता वाढली आहे. विशेष म्हणजे या महिन्यात सचिनने तिसऱ्यांदा पवारांची भेट घेतली आहे. मात्र, ही भेट वैयक्तिक कारणासाठी असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी राज यांनी पवारांना पाडवा मेळाव्याचे आमंत्रण दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पवार राज ठाकरेंच्या मंचावर जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
सांगलीतील उमेदवार बदलणार नाहीत.प्रकाश शेंडगे यांच्या नावाची चर्चा ही केवळ ....
अधिक वाचा