ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

निवडणूक निकालानं शिवसेना-भाजपचा अपेक्षाभंग

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 25, 2019 11:53 AM 2019-02-12T14:15:30+5:30

निवडणूक निकालानं शिवसेना-भाजपचा अपेक्षाभंग

शहर : मुंबई

निवडणूक निकालानं भाजपा आणि शिवसेना दोघांचाही अपेक्षाभंग केला आहे. युतीनं सत्ता स्थापन केल्यावर पुढे काय वाढून ठेवलंय, याची झलक निकाल लागल्यावर पुढच्या काही तासांतच पाहायला मिळाली. भाजपाच्या अडचणी समजून घेतल्या, आता समजून घेणार नाही, मलाही माझा पक्ष वाढवायचा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.पुढे महाराष्ट्रात आणि युतीच्या संसारात काय वाढून ठेवलंय, याचा ट्रेलर उद्धव ठाकरेंनी दाखवला. निकाल पूर्ण समोर येण्याआधीच फिफ्टी फिफ्टीच फॉर्म्युलाची आठवणही उद्धव ठाकरेंनी करुन दिली.यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचाही आकडा घटला आहे. पण शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. निकाल लक्षात घेता हो, जे ठरलंय तेच करु, असं म्हणण्यावाचून सध्या भाजपलाही पर्याय नाही.गेली पाच वर्षं शिवसेनेला तू लहान भाऊच आहेस, असं सातत्यानं सांगण्यात आलं होतं. आता निकालानंतरही भाऊ लहान असला तरी त्याचा आवाज वाढलाय, हे मोठ्या भावाला समजून घ्यावंच लागेल.

 

मागे

महाराष्ट्राच्या निकालावर मोदी आणि शाहंची प्रतिक्रिया
महाराष्ट्राच्या निकालावर मोदी आणि शाहंची प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरूवारी 24 ऑक्टोबर रोजी झाला. न....

अधिक वाचा

पुढे  

मातोश्रीवर ठरणार नव्या सरकारचं भवितव्य,शिवसेना किंग होणार की किंगमेकर?
मातोश्रीवर ठरणार नव्या सरकारचं भवितव्य,शिवसेना किंग होणार की किंगमेकर?

विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला 220 पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास य....

Read more