ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'कुटुंब नियोजनामुळे हिंदुंच्या संख्येत घट', भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचं आक्षेपार्ह वक्तव्य

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 27, 2020 12:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'कुटुंब नियोजनामुळे हिंदुंच्या संख्येत घट', भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचं आक्षेपार्ह वक्तव्य

शहर : देश

कुटुंब नियोजनामुळं देशात हिंदुंच्या संख्येत घट होत असल्याचं आक्षेपार्ह वक्तव्य भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलं आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये छोला दसरा मैदानात विजयादशमी निमित्त आयोजित कार्यक्रमात साध्वी प्रज्ञासिंह पोहोचल्या. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते कमलनाथ, दिग्विजय सिंह आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यावर तोफ डागली. सोबतच कुटुंब नियोजनाबाबत जनतेला एक सल्लाही देऊन टाकला. कुटुंब नियोजनामुळेच हिंदुंच्या संख्येत घट होत असल्याचं सांगत त्यांनी कुटुंब नियोजन करु नका असा सल्लाच अप्रत्यक्षपणे देऊन टाकला.

भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी विजयादशमी निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना कुटु्ंब नियोजनामुळे हिंदुंची संख्या घटत असल्याचं म्हटलं. हिंदुंनी आपल्या मुलांचं संरक्षण करावं. देवाने तोंड दिलं आहे तर तो घासही देईल. आपण सावध झालो नाही तर आता जे धन कमवत आहात त्याचा उपयोग करण्यासाठी तुमच्या मुलांकडे काही नसेल. इतिहास सांगतो की इतिहासातून सावध राहणं शिकलं पाहिजे. त्यामुळे तुमच्या मुलांना राष्ट्रवाद शिकवा. आपल्या देशासाठी समर्पित होण्याची भावना त्यांच्या मनामध्ये रुजवा”, असा सल्ला साध्वी प्रज्ञासिंह यांनी हिंदुंना दिला आहे. दरम्यान साध्वी प्रज्ञासिंह यांच्या या वक्तव्यावरुन आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

विरोधी पक्षनेते कमलनाथांवर निशाणा

मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते कमलनाथ यांनी एका महिला भाजप उमेदवाराबद्दल आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला होता. त्यावरुनही प्रज्ञासिंह यांनी कलमनाथ यांच्यावर जोरदार निशाणा साधला. भारतीय असाल तर महिलांचा सन्मान करणं शिका, नाहीतर रावणाच्या पुतळ्याप्रमाणे तुमचीही अवस्था होईल, अशा इशाराच प्रज्ञासिंह यांनी कमलनाथ यांना दिला. भाजपच्या महिला उमेदवाराबद्दल ज्यांनी आयटम हा शब्द वापरला, ते आपली आई, बायको, बहिण यांनाही याच नावाने आवाज देतात का? असा सवाल प्रज्ञासिंह यांनी कमलनाथांना केलाय.

दिग्विजय सिंह आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यावरही प्रहार

“भोपाळची जनता धर्म आणि अधर्मात भेद करणं जाणते. लोकसभा निवडणूक ही धर्म आणि अधर्म अशीच लढली गेली आणि भोपाळच्या जनतेनं त्यांना दाखवून दिलं की अधर्मावर नेहमी धर्माचाच विजय होत असतो”, अशा शब्दात प्रज्ञासिंह यांनी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर तोफ डागली. तर मेहबुबा मुफ्ती यांच्या आम्ही तिरंगा उचलणार नाही या विधानावरही जोरदार हल्ला चढवला. “अब देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा”, अशा इशाराच त्यांनी मुफ्ती यांना दिला आहे.

मागे

गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं, पंकजा मुंडे यांचं ट्वीट
गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं, पंकजा मुंडे यांचं ट्वीट

ऑनलाईन दसरा मेळावा घेणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह 40 ते 50 जणांवि....

अधिक वाचा

पुढे  

Bihar elections 2020 | पहिल्या टप्प्यातील 71 जागांसाठी आज मतदान; आठ मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
Bihar elections 2020 | पहिल्या टप्प्यातील 71 जागांसाठी आज मतदान; आठ मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात बुधवारी म्हणजेच एकूण 71 जागा....

Read more