By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 31, 2019 03:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्य सरकारने ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या निकषानुसार सरपंचांना महिना 3 हजार रुपये ते 5 हजार रुपयांपर्यंत मानधन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचप्रमाणे उपसरपंचांनी याच निकषानुसार 1 ते 2 हजार रुपये मानधन मिळणार आहे. याचा लाभ राज्यातील 2854 सरपंच व उपसरपंचाना याचा लाभ 1 जुलै 2019 पासून मिळणार आहे.
या निर्णयानुसार 2000 लोकसंख्या असलेल्या गावासाठी सरपंचाचे मानधन 1000 वरुन 3000, 2001 ते 8000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या गावांसाठी दीड हजार एवजी 4000 आणि 8000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीसाठी 5000 रुपये मानधन वाढविण्यात आले आहे. याच पद्धतीने उपसरपंचांना अनुक्रमे 1000, 1500आणि 2000 रुपये मानधन देण्यात येणार आहे.
सिरसी विधानसभा मतदार संघाचे सहा वेळा आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विश्वेश....
अधिक वाचा