By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 27, 2019 05:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : nanded-Waghala
नांदेड जवळील डौर गावाचे संभाजी जाधव (46) शेतीवरील वाढत्या कर्जामुळे निराश होऊन आत्महत्या केल्याची हृद्यद्रावक घटना घडली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मुंबई बाहेरील संभाजी जाधव हे कट्टर समर्थक होते.
राज ठाकरेंनी शिवसेना सोडून मनसेची स्थापना केली, तेव्हा संभाजी जाधव यांनीही शिवसेनेच्या सर्व पदाचा राजीनामा दिला. राज ठाकरेंसोबत जाणारे ते मराठवाड्यातील पहिले पदाधिकारी होते. राज ठाकरेही नांदेडला आले की, संभाजी जाधव यांना आवर्जून भेटत असत. राज ठाकरेंच्या इतक्या जवळच्या कार्यकर्त्याने कर्जाच्या भीतीने आत्महत्या केल्याने नांदेड मध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा बीड मध्ये दाखल होताच श....
अधिक वाचा