By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 29, 2021 11:20 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मराठा आरक्षणाप्रकरणी खासदार संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्प्ष्ट केली. त्यांनी या पत्रकार परिषदेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. तसेच रोखठोक भूमिका मांडली. सरकारला आरक्षणासाठी 3 पर्यायही सुचवले. तसेच सरकारने 6 जूनपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळेस दिला. संभाजीराजेंनी पत्रकार परिषदेत मांडलेले महत्वाचे मुद्दे जाणून घेणार आहोत. (Sambhaji raje Chhatrapati press Conference Top Points on maratha reservation in mumbai)
आरक्षणासाठी 3 पर्याय
रिव्ह्यू याचिका दाखल करावी. केवळ लोकांना दाखवण्यासाठी न करता फुलप्रूफ असावं. हे सर्व राज्य सरकारने करावं.
रिव्ह्यू याचिका न्यायालयात न टिकल्यास क्युरेटिव्ह याचिका दाखल करावी. हे अवघड आहे, पण राज्य सरकारने करायला हवं.
राज्य सरकारने राज्यपालांद्वारे कलम 342 अ नुसार केंद्राला प्रपोजल द्यावं. राज्यपाल ते राष्ट्रपतींना देतील. राष्ट्रपतींना योग्य वाटल्यासं ते केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे पाठवतील. आयोगाला ते योग्य वाटल्यास ते संसदेकडे पाठवतील.
...तर आता राजीनामा देतो
समाजासाठी 2 दिवसांचं विशेष अधिविशेन बोलवावं
मराठा समाजासाठी 2 दिवसांचं विशेष अधिविशेन बोलवण्यात यावं. या अधिवेशनात सरकार मराठा समाजासाठी काय करणार आहे, याबाबतची माहिती द्यावी. तसेच सरकार काही करणार नसेल, तर तसं स्पष्ट करावं.
9 ऑगस्टला क्रांती दिन आहे. या दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत गोलमेज परिषद दिल्लीत पार पडेल. या परिषदेत राज्यातील सर्व 48 खासदार, विरोधी पक्षनेत्यांना बोलावण्यात येणार आहे.
अण्णासाहेब पाटील महामंडळाची पुर्नउभारणी करावी. या महामंडळाद्वारे ग्रामीण क्षेत्रातील गरिब मुलांना कर्जाची सोय होईल. यातून रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वस्तीगृह स्थापित करावी. त्यामध्ये 70 टक्के मराठा समाजाला OBC समाजानुसार सवलत देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरेंकडे करण्यात आली आहे.
मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाला सुरुवात
मराठा समाजाच्या 5 मागण्या 6 जूनपर्यंत मान्य न झाल्यास 7 जूनपासून रायगडावरुन कोव्हिडचा विचार न करता आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचा इशारा. मराठा समाजाला वेठीस धरायचं नाही.
तर नव्या पक्षाची स्थापना
संभाजीराजेंनी या पत्रकार परिषदेदरम्यान नवा राजकीय पक्ष सुरु करण्याबाबब विधान केलं. बहुजन समाजाची इच्छा असल्यास नवा पक्ष स्थापन करु. मात्र सध्या तो विषय नाहीय. समाजासाठी आरक्षण हे महत्वाचं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मराठा समाजाला माझ्या राजीनाम्याने आरक्षण मिळणार असेल तर आता देतो. मी खासदार झाल्यापासून राजधानी दिल्लीमध्ये पहिल्यांदा शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. राष्ट्रपती भवनात महाराजांचं तेलचित्र लावण्यात आलं. माझ्या खासदारकीचा वापर मी गडकिल्यांचं संवर्धन करण्यासाठी वापरतोय. खासदार झाल्याने रायगडाचं संवर्धन झालं.
करोनाची रुग्णसंख्या आणि म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरचे उपचार या मुद्द्य....
अधिक वाचा