ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मराठा वकिलांची फौज आंदोलनात हवीच, सरकारला जाब विचारा, कोल्हापुरात संभाजीराजे आक्रमक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 04, 2020 06:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मराठा वकिलांची फौज आंदोलनात हवीच, सरकारला जाब विचारा, कोल्हापुरात संभाजीराजे आक्रमक

शहर : मुंबई

मराठा आरक्षणाच्या लढ्यात ठराविक वकिलांवर भर देण्यात येऊ नये, मराठा वकिलांची फौज या लढ्यात असली पाहिजे, वकिलांनी यामध्ये  पुढाकार घ्यावा,असे आवाहन संभाजीराजे कोल्हापूरमध्ये आयोजित न्यायिक परिषदेत बोलताना केले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाला EWS मधून आरक्षण नको या भूमिकेचा पुनरुच्चार केला. EWS आरक्षणाचे समर्थन करणारे पुढे काही धोका झाल्यास जबाबदारी घेणार का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राज्य सरकारवर आंदोलनाच्या माध्यमातून वर दबाव टाकलाच पाहिजे. मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई देखील महत्वाची आहे. न्यायिक परिषदेची चळवळ संपूर्ण राज्यात जावी, अशी आशा संभाजीराजेंनी व्यक्त केली.

मराठा आरक्षणासाठी आता आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. मागे काय झालं ते पाहायचं नाही, आता पुढे काय होणार ते पाहिलं पाहिजे. कायदेशीर लढाई लढणाऱ्यांना पाठिंबा कसा देता येईल ते पाहिले पाहिजे, असे संभाजीराजे म्हणाले आहेत. स्थगितीवर आज काही बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

EWS स्वीकारून मराठा आरक्षणासाठी 42 जणांनी दिलेले बलिदान व्यर्थ घालावायच का? असा सवाल देखील संभाजीराजेंनी विचारला. EWS घेतल्यावर धोका होणार नाही, याची जबाबदारी समर्थन करणाऱ्यांनी घ्यावी. EWS मधून आरक्षण घेण्याची भूमिका असणाऱ्यांनी SEBC ला धोका होणार नाही, असे लिहून द्यावे, असे आव्हान संभाजीराजेंनी दिले.

2014 नंतर ESBC आरक्षण आणि त्यानंतर SEBC आरक्षणांतर्गत अनेकांना नियुक्तीच्या ऑर्डर मिळाल्या मात्र, त्यांना कामावर घेतले जात नाही. राज्य सरकारच्या हातात हा विषय आहे, त्यावर सरकार निर्णय का घेत नाही, असा सवाल संभाजीराजेंनी केला.

सारथी, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, राजर्षी शाहू शिष्यवृत्ती, मराठा समाजासाठी वसतिगृहे याबाबत सरकार काम का करत नाही. वकिलांनी याबाबत सरकारला जाब विचारावा. यासंदर्भात आवाज उठवला पाहिजे. कोल्हापूरकरांनी यासाठी पुढाकार घेऊन न्यायालयात याचिका दाखल करावी, असे आवाहन संभाजीराजेंनी केले. बीए केलं, एमबीए केलं वकील झालो असतो तर बर झालं असतं, असेही संभाजीराजे यांनी न्यायिक परिषदेत म्हटले.

मागे

स्व:खर्चाने खड्डे बुजवल्याशिवाय राहणार नाही, केडीएमसीतील अपक्ष नगरसेवकाचा निर्धार
स्व:खर्चाने खड्डे बुजवल्याशिवाय राहणार नाही, केडीएमसीतील अपक्ष नगरसेवकाचा निर्धार

दरवर्षी कल्याण-डोंबिवलीत पावसाळ्यात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या रस्....

अधिक वाचा

पुढे  

काँग्रेस सत्तेत येताच तिन्ही कृषी कायदे रद्द करणार, राहुल गांधी यांची घोषणा
काँग्रेस सत्तेत येताच तिन्ही कृषी कायदे रद्द करणार, राहुल गांधी यांची घोषणा

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्या....

Read more