ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू : संभाजी राजेंची ५ कोटी रुपयेची मदत

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 12, 2019 01:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू : संभाजी राजेंची ५ कोटी रुपयेची मदत

शहर : कोल्हापूर

पूरग्रस्त सांगली, कोल्हापूरला राज्य सरकारसह अनेक ठिकाणांहून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. शिवसेनेकडून विविध सामान असलेले ट्रक गाड्या रवाना झाल्या आहेत. नाशिकचे शिर्डी संस्थान, मुंबईतील सिध्दी विनायक संस्थान यांच्यासह गणपती मंडळे, मराठी कलाकार अनेक संस्था, संघटना, राजकीय पक्षही मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. त्याचबरोबर कित्येक आस्थापनातील कामगार कर्मचार्‍यांनीही आपले महिन्याचे वेतन पूर ग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी पूरग्रस्त भागात ५ कोटी रुपये खर्च करण्याचा संकल्प केला आहे. ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. "माझ्या निधींतून ५ कोटी रुपये महापुराने प्रभावित क्षेत्रात खर्च करण्याचा संकल्प मी केला आहे. मला हे माहिती आहे की, रयतेच्या सेवेकरिता हे काहीही नाही. ही एक सुरवात आहे. शिव-शाहू विचारांसाठी आणि समाज सेवेसाठी माझ संपूर्ण जीवनच समर्पित आहे." असेही संभाजी राजे यांनी म्हटले आहे.

 

मागे

संयुक्त राष्ट्राने नाकारली मध्यस्थीची मागणी , पाकला आणखी एक झटका
संयुक्त राष्ट्राने नाकारली मध्यस्थीची मागणी , पाकला आणखी एक झटका

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलाम 370 केंद्र सरकारने हटविल्यापासून पा....

अधिक वाचा

पुढे  

दंगल गर्ल बबिता फोगाटचा भाजपमध्ये प्रवेश
दंगल गर्ल बबिता फोगाटचा भाजपमध्ये प्रवेश

'दंगल गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेली कुस्तीपट्टू बबिता फोगाटने आपले वडील म....

Read more