By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 26, 2019 11:22 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई – ‘भारतमातेचा पुत्र, त्याला कोणत्याही भाषेचं बंधन नाही, तो कुठल्याही भागातील असो, कोणत्याही स्वरुपाची पूजा करो किंवा कोणत्याही पूजेवर त्याचा विश्वास नसो, एक हिंदू आहे, संघासाठी भारत देशातील सर्व 130 कोटी जनता हिंदू समाज आहे.’ मोहन भागवत म्हणाले.
भारताची पंरपरा हिंदुत्ववादी आहे, भारतात जन्मलेल्या व्यक्तीचा धर्म किंवा प्रदेश कोणताही असो, संघ हा देशातील 130 कोटी जनतेला हिंदू मानतो, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.
धर्म किंवा संस्कृती कोणतीही असो, ज्यांच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना आहे, भारतीय संस्कृती आणि भारतीय परंपरेविषयी ज्यांच्या मनात सन्मान आहे, ते हिंदूच आहेत. संपूर्ण समाज आमचा आहे आणि संघटित समाजाची निर्मिती करणं हे संघाचं उद्दिष्ट आहे, असंही भागवतांनी स्पष्ट केलं.
संघाने सर्वांना स्वीकारले आहे, सर्वांबद्दल त्यांचे चांगले विचार आहेत आणि त्यांच्या उत्कर्षाची इच्छा आहे, असंही भागवतांनी सांगितलं. मोहन भागवत बुधवारी तेलंगणात संघातील स्वयंसेवकांना तीन दिवसीय विजय संकल्पर संबोधित करत होते.
मुंबई - भारतरत्न सन्मानीत माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या स....
अधिक वाचा