By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 11, 2024 01:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
एकनाथ शिंदे हे गुंडांचे सरदार आहे. ते चोरांची टोळी चालवत आहे. मुख्यमंत्र्यांसोबत खंडणीखोर, बलात्कारी, चोर, खून लोक आहेत. जे तुरुंगात असायला हवे, ते मुख्यमंत्र्यांसोबत फिरत आहे. ते फेकूचंद आहेत.
पुणे शहरात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आसीम सरोदे यांच्यावर हल्ला झाला. हल्ला करणारे कोण होते? पुण्यात नवीन आयुक्त अमितेश कुमार यांनी कुख्यात गुंडांना पोलीस आयुक्त कार्यालयात बोलवले. त्यांची परेड केली. दोनशे ते तीनशे गुन्हेगारांना बोलवले होते. परंतु निखिल वागळे आणि आसीम सरदे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना बोलवले नाही. पुण्याचे पोलीस आयुक्ता घाबरले का? आसीम सरोदो, निखिल वागळे यांच्यावर हल्ले करणाऱ्यांचे काय झाले? गुंडांची ओळक परेड हा त्यांचा मोठा शो होता का? कारण आसीम सरोदो, निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांची परेडा का केली नाही? असे प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच ही नोटंकी बंद करा. त्या गुंडांची परडे करा. नाहीतर तुम्ही पोलीस आयुक्त नाही तर भाजप कार्यकर्ते आहेत, असे समजले जाईल, असा हल्ला राऊत यांनी केला.
राज्यातील गुंडगिरीविरोधात मोर्चा
महाराष्ट्रात गुंडगिरी वाढत आहे. रोज खून होत आहे. सरकारमधील मंत्री आणि गुंडाचे फोटो समोर येत आहे. यामुळे सामान्य लोक सुरुक्षित नाही. आता राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे, यामुळे आम्ही महाराष्ट्र बंद करण्याचा विचार करत आहे. मुख्यमंत्री, राज्यपालांच्या निवासस्थानी मोर्चा काढण्याचा विचार आहे. यासंदर्भात महाविकास आघाडीत चर्चा सुरु आहे. आम्ही शांत बसणार नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर संजय राऊत यांनी जोरदार हल्ला केला. एकनाथ शिंदे हे गुंडांचे सरदार आहे. ते चोरांची टोळी चालवत आहे. मुख्यमंत्र्यांसोबत खंडणीखोर, बलात्कारी, चोर, खून लोक आहेत. जे तुरुंगात असायला हवे, ते मुख्यमंत्र्यांसोबत फिरत आहे. ते फेकूचंद आहेत. उद्धव ठाकरे यांना त्यांनी करमचंद जासूस म्हटले. परंतु करमचंद जासूस यांनी किती चांगले काम केले आहे, हे त्यांना माहीत नाही. कारण त्यांचा अभ्यास नाही. त्यांचे वाचन नाही. त्यांचा आसपास विचारवंत, बुद्धवंत असायला हवे. परंतु गुंड आहेत, असा हल्ला संजय राऊत यांनी केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा न....
अधिक वाचा