ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

‘हा’ राजकीय आणि सांस्कृतिक दहशतवाद, तो संपवावाच लागेल, शिवसेनेची डरकाळी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 29, 2021 01:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

‘हा’ राजकीय आणि सांस्कृतिक दहशतवाद, तो संपवावाच लागेल, शिवसेनेची डरकाळी

शहर : मुंबई

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरुन ठाकरे सरकार विरुद्ध कर्नाटक सरकार यांच्यात शाब्दिक फैरी झडतायत. अशातच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून कानडी सरकारचा राजकीय आणि सांस्कृतिक दहशतवाद संपवावाच लागेल, अशी डरकाळी फोडली आहे.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मणरावांचे म्हणणे बरोबर आहे. महाराष्ट्राला कर्नाटकची अर्धा इंचही जमीन नको आहे. महाजन अहवालानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला आलेला भूभाग व त्याशिवाय कर्नाटकात जोरजबरदस्तीने कोंबलेला मराठी भाग, जो महाराष्ट्राच्या हक्काचा आहे, तेवढाच तुकडा महाराष्ट्राला हवा आहे बेळगावची लढाई त्यासाठीच सुरु आहे”, असं अग्रलेखात म्हटलंय बाकी दोन राज्यांत कोणताही वादाचा विषय नाही. मुळात हे प्रकरण न्यायालयात पडून असताना बेळगावसह सीमा भागातून मराठी भाषा, संस्कृतीच्या खुणा उखडून टाकण्याचा चंग कानडी सरकारने बांधला आहे. हा राजकीय आणि सांस्कृतिक दहशतवाद आहे. तो संपवावाच लागेल”, अशी गर्जना राऊत यांनी केली आहे.

महाराष्ट्र भाजप सवदींच्या विधानांचा साधा निषेध तरी करणार आहेत की नाही…?

कोर्टाचा निकाल लागेपर्यंत सीमा भाग केंद्रशासित करा, अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी करताच कानडी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना मिरच्या झोंबल्या आहेत व त्यांनी थयथयाट सुरू केला आहे, पण त्यांच्या थयथयाटाला भीक घालण्याची गरज नाही. ‘मुंबईतसुद्धा भरपूर कानडी लोक राहतात, म्हणून मुंबई शहर कर्नाटकास जोडा’ असे एक टिनपाट विधान लक्ष्मणरावांनी केले आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदींचे हे विधान म्हणजे ते ठार वेडे असल्याचे लक्षण आहे. सवदी यांनी 105 संयुक्त महाराष्ट्र हुतात्म्यांचाच अपमान केला. सवदी हे भाजपचे पुढारी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील यच्चयावत भाजप पुढाऱ्यांचे यावर काय म्हणणे आहे? एरवी ऊठसूट शब्दांचा खुळखुळा वाजवणारे हे लोक सवदींच्या विधानांचा साधा निषेध तरी करणार आहेत की नाही?”, असा सवाल राऊत यांनी विचारला आहे.

सवदींसारख्या बिनडोक लोकांनी सीमा लढ्याचा इतिहास समजून घ्यावा

सवदींसारख्या बिनडोक लोकांनी सीमा लढ्याचा इतिहास जरा समजून घेतला पाहिजे. ते पाळण्यातली गोधडी भिजवत होते त्याआधीपासून बेळगावसह सीमा भागातील मराठी बांधव महाराष्ट्रात येण्यासाठी लढत आहेत, अशी बोचरी टीका राऊत यांनी केलीय.

पंढरीचा विठोबा जसा आमचा आहे तसा कानडा विठ्ठलही आमचाच

दुसरे असे की, सीमा भाग हा जमिनीचा लढा नक्कीच आहे, पण त्याहीपेक्षा तो मराठी भाषा, संस्कृती, अस्मिता जतन करण्याचा लढा आहे व तो हक्क देशाच्या घटनेनेच प्रत्येकाला दिला आहे. इतिहास असे सांगतो की, राज्य पुनर्रचना आयोगाने बेळगावसह कारवार, भालकी, निपाणी अशा असंख्य मराठी भाषिक शहरांना आणि गावांना त्यांच्या इच्छेविरुद्ध कर्नाटकात ढकलले आहे. मराठी व कानडीचे अजिबात भांडण नाही. पंढरीचा विठोबा जसा आमचा आहे तसा कानडा विठ्ठलही आमचाच. दोन्ही प्रदेशांचे ऋणानुबंध” असल्याचंही राऊतांनी अग्रलेखातून अधोरेकित केलंय.

म्हणून ‘सीमा भाग केंद्रशासित करा’ अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली

येळ्ळूर गावातील छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा जेसीबी लावून उचलण्यात आला. हे वातावरण अन्यायाचे आहे व कानडी सरकार मराठी बांधवांशी याच बेलगाम पद्धतीने वागणार असेल तर ‘सीमा भाग केंद्रशासित करा’ या मागणीशिवाय दुसरा कोणताही पर्याय महाराष्ट्रापुढे उरत नाही. सीमावाद सर्वोच्च न्यायालयात आहे. अर्णब, कंगनासारख्यांना सर्वोच्च न्यायालयात झटपट न्याय मिळतो, पण लाखो मराठी सीमा बांधवांचा आक्रोश, त्यांनी सांडलेल्या रक्ताची वेदना सर्वोच्च न्यायालयास दिसत नाही का? पुन्हा हे सर्व प्रकरण कोर्टात प्रलंबित असताना कर्नाटक सरकारने बेळगावला उपराजधानीचा दर्जा देऊन तेथे विधान भवन निर्माण केले. हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान नाही काय? पण सध्याचा देशाचा एकंदरीत कारभार पाहता न्याय आणि कायद्यावर काय बोलावे हा प्रश्नच आहे”, अशी टोलेबाजीही राऊत यांनी केली आहे.

मागे

गिरीश महाजन दुसऱ्यांदा अण्णा हजारे यांच्या भेटीला, भाजप नेत्यांकडून मनधरणी सुरु
गिरीश महाजन दुसऱ्यांदा अण्णा हजारे यांच्या भेटीला, भाजप नेत्यांकडून मनधरणी सुरु

भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे या....

अधिक वाचा

पुढे  

काँग्रेस प्रदेशाध्यक्षापदाबाबत दिल्ली दरबारी बैठक, थोरात-वडेट्टीवारांसह मंत्री उपस्थित राहणार
काँग्रेस प्रदेशाध्यक्षापदाबाबत दिल्ली दरबारी बैठक, थोरात-वडेट्टीवारांसह मंत्री उपस्थित राहणार

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या निवडीवर पक्षाच्या राज्यातील सर्....

Read more