By SEJAL PURWAR | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2019 03:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गेली काही वर्षे शिवसेनेची भूमिका प्रभावीपणे मांडणार्या खासदार संजय राऊत यांचे नाव पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी निवडण्यात आलेल्या 17 जणांच्या यादीतून वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
मध्यांतरीच्या काळात संजय राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य करून शिवसेनेची कोंडी केल्याचे म्हंटले जाते. तर काही जाणकारांच्या मते संजय राऊत यांच्या वादग्रस्थ विधांनांमुळे शिवसेनाभाजप युतीत तनाव निर्माण झाल्याची चिन्हे दिसत होती. त्यातच राऊत यांनी केंद्र सरकारवरही टीका केली.
दरम्यान आज मतदार केल्यानंतर संजय राऊत यांनी यंदा तरी आमच्या समोर एक सक्षम विरोधी पक्ष यावा, अशी इच्छा व्यक्त केली. मात्र काल रवीवारीच शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून आपली अधिकृत भूमीका मांडण्यासाठी 17 जणांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली.या 17 जणांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमधुन शिवसेनेत आलेल्या माजी आमदार व माजी मंत्री सचिन अहिर यांचा समावेश करण्यात आला आहे. नेहमी पक्षाची भूमीका मांडणार्या नेत्यांच्या यादीत संजय राऊत यांचे नाव पहिल्या क्रमांकावर असायचे. यावेळी दिनांक 21 आणि 24 ऑक्टोबर रोजी विविध प्रसार माध्यमात शिवसेनेची अधिकृत भूमीका मांडण्यासाठी 17 जणांची निवड करण्यात आली. त्यात संजय राऊत यांचे नाव वगळण्यात आले आहे. या 17 जनांमध्ये केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, उपसभापती डॉ. निलम गोर्हे ,शिवसेना प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी ,आमदार डॉ.मनीषा कायंदे, आनिल परब ,खासदार भावना गवळी, धैर्यशील माने, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, नगरसेविका शीतल चव्हाण, विशाखा राऊत, माजी महापौर शुभा राऊळ, आमदार सुनील शिंदे, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई, साईनाथ दुर्गे, किशोर कन्हेरे यांचा समावेश आहे.
मुंबई - महाराष्ट्रात आज होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सट्टा बाजारात 30 ....
अधिक वाचा