By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 01, 2024 12:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोण सोम्या गोम्या ते लवकरच...; संजय राऊत यांचा पुन्हा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल. शिंदे सरकारवरही निशाणा. इतके नामर्द मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री देशाच्या इतिहासात कधीही झालेले नाहीत, असं म्हणत राऊतांचं टीकास्त्र
आजपासून 2024 हे नववर्ष सुरु होत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. इतके नामर्द मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री देशाच्या इतिहासात झाले नाहीत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. जे डरपोक लोक होते. बेईमान लोक होते. ते निघून गेले. जे एकनिष्ठ होते. ते आमच्यासोबत थांबले आहेत. पण आमच्यासोबतच्या आणि शरद पवार यांच्यासोबतच्या नेत्यांना अमिष दाखवलं जातंय. त्यांच्यावर दवाब आणला जात आहे. पण आता आमच्यासोबत असलेले हे अत्यंत निष्ठावान आणि मर्द लोक आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
शिंदे सरकारवर हल्लाबोल
महाराष्ट्रावर दिल्लीतून आक्रमन होतंय. राज्यातील उद्योग पळवले जात आहेत. रोजगार पळवला जात असताना, महाराष्ट्राचा पदोपदी अपमान केला जात आहे. असं असताना सध्याच्या सरकारमधले हौशे-नौशे-गौशे तोंडाला कुलुप लावून गप्प आहेत. त्यांना आमच्यावर बोलण्याचा अधिकार नाही. इतकं नामर्द सरकार आणि नामर्द मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या इतिहासात झाले नाहीत, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.
“प्रकल्प राज्याबाहेर जातायेत”
टेस्ला प्रकल्प असेल पाणबुडी प्रकल्प असेल. त्याच्या आधीचे प्रकल्प असतील. डायमंड मार्केट असं अनेक प्रकल्प आमच्या डोळ्यासमोर घेऊन जातात. हे सरकार एक मुख्यमंत्री त्यांचे दोन उपमुख्यमंत्री हे डोळ्यावर कातडं आणि तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. इतकं नामर्द सरकार या महाराष्ट्र मध्ये कधी आलं नव्हतं. इतिहासात आणि भविष्यात कधी येणार नाही, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर केला आहे.
अजित पवारांवर पलटवार
सोम्या गोम्याच्या प्रश्नावर मी बोलत नाही, असं अजित पवार यांनी आज सकाळी म्हटलं. अजित पवारांच्या या टीकेला संजय राऊतांनी उत्तर दिलंय. त्यांचे सोम्या गोम्या दिल्लीत आहेत. ज्यांनी गुलामी पत्करली आहे. जे डरपोक आहेत. त्यांनी आमच्यावर बोलू नये आणि याच्यापेक्षा मला जास्त बोलण्याची गरज नाही. सोम्या गोम्या कोण आहेत? ते 2024 ला कळेल, असं म्हणत संजय राऊत यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलंय.
महाराष्ट्राच्या सिंधुदुर्गातील पाणीबुडी प्रकल्प गुजरातला जाणार असल्याच....
अधिक वाचा