By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 04, 2019 06:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
नुकतीच शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात देशात असलेल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले की, " देशातील आर्थिक मंदीमुळे बेरोजगारीची समस्या वाढत आहे. भारताची अवस्था रशिया सारखी होऊ नये. सरकारने यावर उपाययोजना करावी. कॉंग्रेसच्या काळात ही मंदी होती मात्र त्यातून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अंत्यंत उत्तम काम करून देशाला त्यातून बाहेर काढलं."
मनमोहन सिंग यांचं उदाहरण देऊन संजय राऊत भाजपा सरकारला बेरोजगारीचे उपाय करायला सुचवत आहेत. मात्र प्रकाश जावडेकर यांनी नुकतेच मनमोहन सिंग यांचं मत जास्त मनावर घेऊ नका अस म्हटल होत. त्याच काय करायच ? हा प्रश्न पडतो.
पुढे येणार्या विधानसभा निवडनुकीबद्दल होत असलेल्या नेते मंडळीची होणारी भरती,नारायण राणे व छगन भुजबळ यांचे भाजपा व शिवसेनेत होणारे प्रवेश यावर बोलताना ते म्हणाले की, "भुजबळांनी मी तिथेच समाधानी आहे. अस म्हटलय त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे त्यामुळे व त्यांच्या प्रवेशाबद्दल शिवसैनिकानी काहीच मत व्यक्त केल नाहीय". पुढे बोलताना ते म्हणाले की," राणेना भाजपात प्रवेश द्यायचा की नाही तो बीजेपीचा प्रश्न आहे."
कृष्णा पाणी वाटप लवादाला आव्हान देणाऱ्या आंध्रप्रदेशच्या याचिकेला संयुक्....
अधिक वाचा