By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 28, 2019 05:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
शिवसेनेचे खासदार आणि दै.’सामना’ चे संपादक संजय राऊत यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना देण्यात येणार्या वाय दर्जाच्या सुरक्षेत १ किवा २ कमांडो आणि पोलिस कर्मचार्यासह ११ जावान तैनात करण्यात येणार आहेत. त्याशिवाय दोन वैयक्तिक सुरक्षा अधिकार्याचाही (पीएसओ) यामध्ये समावेश होतो.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटविल्यानंतर संजय राऊत यांनी राज्यसभेत जोरदार भाषण केले. त्यामुळे पाकिस्तानात त्याच्या निषेधाचे पोस्टर्स झळकले. मात्र या भाषणानंतर खुद्द भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी बाक वाजवून राऊत यांच्या जीवाला असलेल्या संभाव्या धोका लक्षात घेऊन त्यांची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. गृह विभागाच्या अहवालातही संजय राऊत यांच्या जीवाला धोका असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सहजिकच त्याच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (गुरुवार 28 नोव्हेंबर) महाराष्ट्राच्या मु....
अधिक वाचा