ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पापी अजित पवार नजरेला नजर मिळवत नव्हते, काळोखातील पाप काळोखात नष्ट होईल : संजय राऊत

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 23, 2019 06:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पापी अजित पवार नजरेला नजर मिळवत नव्हते, काळोखातील पाप काळोखात नष्ट होईल : संजय राऊत

शहर : मुंबई

महाराष्ट्राच्या राजकारणात एका रात्रीत भूकंप झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. संपूर्ण महाराष्ट्रात साखरझोपेत असताना रातोरात राष्ट्रपती राजवट हटवली गेली. इतकंच काय तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधीही पार पडला.

या सर्व पार्श्वभूमीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांवर हल्लाबोल केलाअजित पवारांनी रात्रीत पाप केलं आहे. ते नजरेला नजर मिळवत नव्हते. अंधारातील पाप अंधारात नष्ट होईल, शरद पवारांचा यामागे काही हात नाही हा माझा विश्वास आहे असं संजय राऊत म्हणाले.

अजित पवार काल रात्रीपर्यंत आमच्यासोबत होते. ते आमच्या नजरेला नजर देऊन बोलत नव्हते. ते लक्षात येत होतं, शरद पवार यांच्याही लक्षात आलं. त्यानंतर ते बाहेर पडले. त्यांचा फोन बंद झाला. ते वकिलाकडे बसल्याचं सांगण्यात आलं. ते कोणत्या वकिलाकडे बसले होते ते आज सकाळी कळालं. यामागे शरद पवार यांचा हात नाही हे मी ठामपणे सांगू शकतो. शरद पवारांना ईडीची नोटीस आली त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पवारांच्या मागे उभा राहिला. त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. त्यावेळी अजित पवारांनी राजीनामा दिला. त्याचवेळी आम्हाला संशय आला होता, असं संजय राऊत म्हणाले.

अजित पवार काल रात्रीपर्यंत आमच्यासोबत होते. मात्र ते बैठकीत आमच्या  नजरेला नजर मिळवत नव्हते. त्यांची देहबोली संशयास्पद होती. ते आमच्या लक्षात येत होतं, शरद पवार यांच्याही लक्षात आलं. यामागे शरद पवार यांचा हात नाही हे मी ठामपणे सांगू शकतो. अजित पवारांनी शरद पवारांना दगा दिला.याला महाराष्ट्राची जनता उत्तर देईल.

फडणवीसांच्या सरकारच्या काळात अजित पवारांची जागा ऑर्थर रोड जेलमध्ये आहे हे वारंवार सांगण्यात आलं. आता यापुढील कॅबिनेटच्या बैठका ऑर्थर रोड जेलमध्ये  होणार का?अंधारात पाप होतं. चोरुन पार केलं जातं. याचा अर्थ यांनी चोरी केली, डाका टाकला. यांना याची किंमत मोजावी लागेल. मात्र, ज्याने शरद पवार यांना या वयात घरातूनच दगा देण्याचा प्रयत्न केला, त्याला जनता उत्तर देईल. पैसा आणि सत्तेचा गैरवापर करुन हे सर्व केलं. राज्याची जनता हे पाप ठोकारुन लावेल. डोळे उघडण्याआधी हे पाप नष्ट होईल.

अजित पवार यांची काय प्रतिक्रिया आहे हे माहिती नाही. भाजपने राजभवनाचा ज्याप्रकारे गैरवापर केला ते लोकशाहीत शोभत नाही. त्यांनी या संस्थांचा सत्ता, पैसा यांचा उपयोग करुन फसवलं, असं संजय राऊत म्हणाले.राज्यपाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आले आहेत. ते संस्कारी आहेत असं वाटत होतं. मात्र, निराशा झाली. अजित पवार यांनी आणि त्यांच्यासोबत जे गेले त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाशी बेईमानी केली. अजित पवारांना राज्यात फिरुन देणार नाही.

मागे

अजित पवारांचा आमदारांकरवी शरद पवारांना निरोप
अजित पवारांचा आमदारांकरवी शरद पवारांना निरोप

राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेल्या अजित पवार यांची समजूत काढण्यासाठी राष्ट्....

अधिक वाचा

पुढे  

पुढचं सरकार आपलेच, शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार - उद्धव ठाकरे
पुढचं सरकार आपलेच, शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार - उद्धव ठाकरे

काळजी करु नका. पुढचे सरकार आपलेच असेल. मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असणार आहे. त....

Read more