ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'मी पुन्हा येईन' असं सारखं म्हणणार नाही, पण पुढचे 25 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री : संजय राऊत

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 15, 2019 10:44 AM 2019-02-12T14:15:30+5:30

'मी पुन्हा येईन' असं सारखं म्हणणार नाही, पण पुढचे 25 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री : संजय राऊत

शहर : मुंबई

मी पुन्हा येईन असं सारखं म्हणणार नाही. पण पुढचे पाचच काय, तर पुढचे 25 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. राऊतांनी दररोज पत्रकार परिषद घेण्याचा सिलसिला आपल्या वाढदिवशीही कायम ठेवला.

किमान समान कार्यक्रमावर काम सुरु आहे. अद्याप कोणताही फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. मात्र फॉर्म्युलाची चिंता कोणीही करु नये. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सक्षम आहेत. आम्ही 24 तारखेपासून सांगत आहोत. लाख प्रयत्न करा आम्हाला थांबवण्याचा, पण शिवसेनेच्याच नेतृत्वात सत्तास्थापन होईल असा विश्वास संजय राऊत यांनी बोलून दाखवला.

शिवसेनेचा मुख्यमंत्री पाच वर्षांसाठी असेल, की राष्ट्रवादीसोबत अडीच-अडीच वर्ष वाटून घेणार, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर पाचच काय, पुढील 25 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं. बातम्या पेरणाऱ्यांचे स्रोत मला माहित आहेत, असंही राऊत म्हणाले.

मी सारखंपुन्हा येईन-‘पुन्हा येईन म्हणत नाही, असं बोलत राऊतांनी देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावला. महाराष्ट्राशी आमचं पाच वर्षांचं टेम्पररी नातं नाही. आम्ही राज्यातच राहणार. येत-जात नाही राहणार, असं संजय राऊत म्हणाले.स्वातंत्र्यवीर सावरकर यांनाभारतरत्न का नाही दिलं? आम्हीचभारतरत्नची मागणी केली होती, असं संजय राऊतांनी भाजपच्या जाहीरनाम्यावर भाष्य केलं.

काँग्रेस नेत्यांचं, वसंतदादा पाटील यांचं स्वातंत्र्यसंग्रामात मोठं योगदान असल्याचं आम्ही कायमच सांगत आलो आहोत, असंही राऊत म्हणाले. वाजपेयी पहिलं सरकार, शरद पवार 1980 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झालं ते पुलोद सरकारही संमिश्र होतं. पवार काँग्रेस विचारधारेचे होते, पण त्यांच्या मंत्रिमंडळात भाजप-जनसंघाचे नेते होते, अशी आठवणही राऊतांनी  करुन दिली.

महासेनाआघाडीत मुख्यमंत्रिपद कोणाकडे असेल, असं नवाब मलिक यांना विचारण्यात आलं होतं, त्यावरमुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरच शिवसेना वेगळी झाली आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान राखणं आणि त्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवणं ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल.’ असं नवाब मलिक म्हणाले होते.

 

मागे

कर्नाटकमधील १६ बंडखोर आमदार भाजपमध्ये,पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्यता
कर्नाटकमधील १६ बंडखोर आमदार भाजपमध्ये,पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्यता

कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएसच्या ज्या १७ मंत्र्यांना अपात्र ठरविण्यात आले....

अधिक वाचा

पुढे  

क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं,मॅच हातातून गेली वाटत असतानाच …: गडकरी
क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं,मॅच हातातून गेली वाटत असतानाच …: गडकरी

क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं, हातातली मॅच जात आहे, असं वाटत असतानाच....

Read more