By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 24, 2019 02:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्रातल्या 45-सातारा या लोकसभा मतदार संघासाठी पोटनिवडणूक घेण्याचा कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला.
या कार्यक्रमानुसार शुक्रवार 27 सप्टेंबर 2019 रोजी अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर शुक्रवार असून अर्जांची छाननी शनिवार 5 ऑक्टोबरला होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 7 ऑक्टोबर सोमवार असेल.
या निवडणुकीसाठी देखील विधानसभा निवडणुकीसोबतच म्हणजेच 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून मतमोजणी 24 ऑक्टोबरला होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जारी करण्यात आलेले सर्व नियम आणि निर्बंध या पोटनिवडणुकीसाठी देखील लागू होतील.
ही निवडणूक उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्यामुळे रिकामी झाली होती. त्यांनी नुकताच भाजप मध्ये प्रवेश केला. त्यामुळे पुन्हा एकदा निवडून येण्याचे मोठे आवाहन त्यांच्या समोर ह्या निवडणुकीमुळे आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेही अखेर विधानसभा निवडणूक लढण्याचे ठरले असल्या....
अधिक वाचा