By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 22, 2019 11:48 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता प्रत्येकाला निवडणूक निकालाची उत्सुकता लागली आहे. मतदानानंतर आलेल्या विविध संस्थांच्या एक्झिट पोलमधून महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र असं असलं तरीही काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अजूनही चमत्काराची अपेक्षा आहे.
एक्झिट पोलमधून भाजप-शिवसेना पुन्हा सत्ता काबीज करत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर सट्टाबाजारातही फारसं वेगळ चित्र नाही. भाजप आणि शिवसेनाच सत्तेचे प्रबळ दावेदार असल्याचं सट्टाबाजाराचं म्हणणं आहे. यावेळी महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर कोट्यवधी रुपयांचा सट्टा लागला आहे.
सट्टाबाजारात काय आहे स्थिती?
यंदाच्या निवडणुकीत भाजप 120 जागांवर विजयी होईल, यासाठी सट्टाबाजारात एक रुपया 60 पैसे इतका दर सुरू आहे. तर शिवसेनेला 85 जागांवर यश मिळेल या अंदाजासाठी 3 रुपयांचा दर लावण्यात आला आहे. सट्टाबाजाराने काँग्रेसला 30 जागांवर विजय मिळेल, यासाठी 2.50 रुपये तर राष्ट्रवादीच्या 30 जागांसाठी 3.50 रुपयांचा दर सुरू आहे. याबाबत एका हिंदी वेबसाईटने वृत्त दिलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं आहे. सगळ्या उमेदवारांचं भवि....
अधिक वाचा