By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 22, 2019 01:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सांगली
कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांचा भाजप मध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे. सत्यजित देशमुख कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस या पदावर आहेत. परंतु अंतर्गत गटबाजीला ते कंटाळले आहेत.
लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर कॉंग्रेसला लागलेली गळती अद्याप थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. अनेक आमदार पक्ष सोडून जात असतानाच आता त्यात पदाधिकार्यांची भर पडत असल्याचे दिसत आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची सत्यजित देशमुख यांच्याशी बोलणी सुरू आहेत. त्यांना भाजपाकडून शिराळा विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळू शकते. कारण सांगली जिल्ह्यात देशमुख कुटुंबाला मानणारा गट आहे. सत्यजित देशमुख यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादी च्या आघाडी सरकार मध्ये मंत्रिपद भूषविले आहे.
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमिताने ना....
अधिक वाचा