By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 14, 2019 12:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राफेल लढाऊ विमान खरेदीप्रकरणी पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. यामुळे मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोपावरील याचिका फेटालून लावली आहे.
राफेल विमान खरेदी प्रकरणात २०१८ च्या निर्णयावर सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्यासह काही जणांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायाधीश संजय किशन कौल आणि न्यायाधीश केएम जोसेफ यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला आहे.या याचिकेत राफेल खरेदीप्रकरणात घोटाळा झाल्य़ाचा आरोप करण्यात आला होता. पीएम ऑफीसने संरक्षण खात्याला विश्वासात न घेता ही खरेदी केल्याचं म्हटलं होतं. विमानाच्या किंमतीबाबतही याचिका करण्यात आली होती. या प्रकरणात कोर्टाने याआधी निर्णय दिला होती की, ठोस पुराव्यांशिवाय संरक्षण खात्याच्या प्रकरणात दखल नाही देता येणार.
राफेल लढाऊ विमान खरेदीप्रकरणी पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. यामुळे मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोपावरील याचिका फेटालून लावली आहे.
राफेल विमान खरेदी प्रकरणात २०१८ च्या निर्णयावर सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्यासह काही जणांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायाधीश संजय किशन कौल आणि न्यायाधीश केएम जोसेफ यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला आहे.
या याचिकेत राफेल खरेदीप्रकरणात घोटाळा झाल्य़ाचा आरोप करण्यात आला होता. पीएम ऑफीसने संरक्षण खात्याला विश्वासात न घेता ही खरेदी केल्याचं म्हटलं होतं. विमानाच्या किंमतीबाबतही याचिका करण्यात आली होती. या प्रकरणात कोर्टाने याआधी निर्णय दिला होती की, ठोस पुराव्यांशिवाय संरक्षण खात्याच्या प्रकरणात दखल नाही देता येणार.
महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाल्यानंतर शिवसेना-भाजप-काँग्रे....
अधिक वाचा