By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 11, 2019 01:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
कर्नाटकमधील राजीनामा दिलेल्या 10 बंडखोर आमदारांनी आज संध्याकाळ पर्यंत विधान सभा अध्यक्षांसमोर हजार राहावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे या बंडखोर आमदारांना मोठा झटका बसला आहे.
राजीनामा देत बंडखोरी केलेल्या आमदारांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात राजीनामे स्वीकारण्याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावरील सुनावणीत विधानसभा अध्यक्षणही आजच राजीनाम्या बाबत निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. तसेच राजीनामा दिलेल्या आमदारांना डिजिपी यांनी सुरक्षा द्यावी, असेही न्यायालयाने बजावले आहे.
कॉंग्रेसने मध्यप्रदेशात कर्नाटकची पुंनरावृती होऊ नये म्हणून काळजी घेतली ....
अधिक वाचा