ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शरद पवारांना समजले असेल, पाठीत खंजीर कसा खुपसतात ते? - शालिनीताई पाटील

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 25, 2019 09:58 AM 2019-02-12T14:15:30+5:30

शरद पवारांना समजले असेल, पाठीत खंजीर कसा खुपसतात ते? - शालिनीताई पाटील

शहर : मुंबई

स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खूपसून त्यांचे चांगले सरकार पाडणाऱ्या शरद पवारांना पाठीत खंजीर खूपसणं काय असतं हे आज कळले असेल, अशी टीका माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी केली आहे. शरद पवारांनी ५० वर्षांपूर्वी एक पाप केले होते. जे पाप केले ते इथेच फेडावे लागते. कोणी दगा दिल्यास काय त्रास होतो, हे शरद पवारांना अनुभवायला येईल, असेही त्या म्हणाल्या आहेत. दरम्यान, शालिनीताई कट्टर पवारविरोधक म्हणून ओळखल्या जातात.

दरम्यान, राज्याच्या राजकारणात पवार घराणे मातब्बर घराणे. या घराण्याच्या तीन ते चार पिढ्या राजकारणात उतरल्या. पण घर अभेद्य होते. अजित पवारांच्या बंडामुळे हे घरं फुटले आहे. इतर राजकीय घराण्यांप्रमाणं घरफुटीचे दुखः पवार घराण्याच्याही वाट्याला आले आहे. बारामतीचे पवार. सगळ्या घरांमध्ये असतात तशा थोड्या फार कुरबुरी यांच्याही घरात असणारच की. त्यातच राजकारण म्हटल्यावर तर महत्त्वाकांक्षाही जास्तच असणार. पण तरीही हे कुटुंब खंबीर आणि एकसंध होते. पण शेवटी काका-पुतण्या वैराचा वेढा बारामतीच्या पवारांना पडलाच.

अजित पवार, तसे थोडे भडक डोक्याचेच. पण काकांचे बोट धरुन वाढलेले आणि त्यांच्या शब्दाबाहेर नसलेले. पण राजकीय महत्त्वाकांक्षा काही स्वस्थ बसू देत नाहीत. त्यातूनच हे घडले. घर फुटल्याचं दुःखे सुप्रिया सुळेंच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. अजित पवारांच्या बंडानंतर सुप्रिया सुळेंना बसलेला धक्का त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. पक्ष फुटला कुटुंब फुटले असा स्टेटस ठेवला. त्यांनी आणखी दोन ते तीन स्टेटस टाकले. जे कुटुंबावर आघात झाला आहे. हे सांगण्यासाठी पुरेसे होते.

रोहित पवारांनाही अजित पवारांच्या बंडाचा धक्का बसला. रोहित पवारांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये अजित पवारांना स्वगृही येण्याची हाक दिली. अजितदादांच्या वडिलांच्या पश्चात दादांच्या लहानपणापासून त्यांना वडिलांचे प्रेम देणारे साहेबच होते. तसेच आदरणीय पवार साहेबांवर अडचण आल्यानंतर खंबीर भूमिका घेणारे अजितदादा देखील आपण पाहिले आहेत. प्रश्न कौटुंबिक असो की राजकीय खचून जाणं हे साहेबांच्या डिक्शनरीत नाही.आजच्या घडामोडी पाहताना जूनं चित्र कायम तसंच असावं. अजितदादांनी साहेबांचे निर्णय मान्य करावेत आणि स्वगृही परत यावं असं मनापासून वाटते. असं रोहित पवार म्हणाले. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घराणी फुटली. ठाकरे घराणं फुटलं. मुंडे घराणे फुटलं त्यानंतर आता पवार कुटुंब फुटले. कुटुंब फुटण्याचं दुखः दुर्दैवाने पवार कुटुंबालाही चुकले नाही.

 

मागे

अजित पवारांना अडीच वर्षे CM पद देण्यास शिवसेना तयार? – सूत्र
अजित पवारांना अडीच वर्षे CM पद देण्यास शिवसेना तयार? – सूत्र

अजित पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहे. फक्त राष्ट्रवादीच नाही त....

अधिक वाचा

पुढे  

अजित पवारांनी असं का केलं ठाऊक नाही- शरद पवार
अजित पवारांनी असं का केलं ठाऊक नाही- शरद पवार

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सोमवारी सकाळीच कराडच्या दिशेने रवाना झ....

Read more