By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 02, 2024 10:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : baramati
Maharashtra Politics : शरद पवार 20 युवकांना संधी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दादांच्या आमदारांविरुद्ध तरुण उमेदवार देणार आहेत. बंडखोर आमदारांविरोधात पवारांनी दंड थोपटले आहेत.
विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार मोठी खेळी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार 20 युवकांना संधी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दिग्गजांविरोधात हे 20 तरुण चेहरे मैदानात उतरतील अशी शक्यता आहे.त्यामुळे शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीआधी अजित पवारांच्या आमदारांविरोधात दंड थोपटल्याचं दिसत आहे. बारामती, अणुशक्ती नगर, दिंडोरी, श्रीवर्धन, परळी, कागल ते आंबेगाव अशा 20 मतदारसंघात नवीन चेहरे दिसण्याची शक्यता आहे.
शरद पवारांच्या तरुण उमेदवारांची यादी; कोण कुठुन लढणार?
1) अहेरी
सद्या आमदार धर्मारावबाबा आत्राम
2)आष्टी
सद्या आमदार बाळासाहेब आसबे
3) दिंडोरी
सद्या आमदार नरहरी झिरवळ
4) गेवराई
सद्या भाजपचा आमदार आहे
5) श्रीवर्धन
सद्या आमदार अदिती तटकरे आहे.
6) हडपसर
सद्या आमदार चेतन तुपे आहे.
7) पुसद
सद्या आमदार इंद्रनील नाईक आहे.
8) बारामती
सद्या आमदार अजित पवार आहे.
9) अळमनेर
सद्या आमदार अनिल पाटील आहे.
10) उदगीर (अ.जा.)
सद्या आमदार संजय बनसोडे आहे.
11) इंदापूर
सद्या आमदार दत्तात्रय भरणे आहे.
12) अणुशक्ती नगर
सद्या आमदार नवाब मलिक आहे.
13) परळी
सद्या आमदार धनजंय मुंडे आहे.
14) कागल
सद्या आमदार हसन मुश्रीफ आहे.
15) आंबेगाव
सद्या आमदार दिलीप वळसे पाटील आहे.
16) मावळ
सद्या आमदार सुनील शेळके आहे.
17) सिन्नर
सद्या आमदार माणिकराव कोकाटे आहे.
18) तुमसर
सद्या आमदार राजू कोरमोरे आहे.
19) फलटण (अ.जा)
सद्या आमदार दीपक चव्हाण आहे.
20) वडगाव शेरी
सद्या आमदार सुनील टिंगरे आहे.
फडणवीसांच्या सांगण्यावरून चित्रा वाघांनी आपलं घर फोडल्याचा शरद पवार गटाच्या विद्या चव्हाण यांचा आरोप
फडणवीसांच्या सांगण्यावरून चित्रा वाघांनी आपलं घर फोडल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विद्या चव्हाण यांनी केलाय...त्याचबरोबर त्यांनी एका पेनड्राईव्हमधील संभाषण पत्रकार परिषदेमध्ये ऐकवत चित्रा वाघांवर आरोप केलेत...तर विद्या चव्हाण यांची सून शरद पवारांसह राष्ट्रवादीमधील नेत्यांकडे गेली होती...मात्र त्यांची कुणीही मदत केली नाही...म्हणून आपल्याला मदत करावी लागल्याचा पलटवार चित्रा वाघ यांनी केलाय..
वेषांतराच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना खडे बो....
अधिक वाचा