By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 09, 2019 05:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
हैद्राबाद आणि गुजरातमधील काही लोकांनी माझ्यासमोर मशीन ठेवले होते. त्यात घड्याळाचं बटण दाबल्यास मत कमळाला गेल्याचं मी स्वत: डोळ्यांनी पाहिलंय, असा धक्कादायक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. आता ट्वीट करून पवारांनी आणखी एक विधान केलं आहे. निवडणुकीच्या काळात ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. गुजरात व हैदराबाद येथील काही ईव्हीएम मशिन्सची तपासणी केली असता घड्याळाचं बटन दाबलं तर कमळाला मत गेल्याचे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलंय, त्यामुळे ईव्हीएम मशीन्सबाबत मला चिंता वाटते. सगळ्याच मशीनमध्ये असे असेल असे मला वाटत नाही, मात्र मी हे पाहिलेलं आहे, म्हणून काळजी व्यक्त केली. यासाठी आम्ही न्यायालयात गेलो, मात्र दुर्दैवाने न्यायालयाने आमचे म्हणणे ऐकले नाही.
सहाव्या टप्प्यातील प्रचार आज संपला. लोकसभा निवडणूकीच्या सहाव्या टप्प्य....
अधिक वाचा