ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

40 मिनिटे भाषण करु शकता, मग चक्कर कशी येते? - शरद पवार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2019 01:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

40 मिनिटे भाषण करु शकता, मग चक्कर कशी येते? - शरद पवार

शहर : मुंबई

राज्यभरात सर्वत्र मतदानाचा उत्साह दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सकाळी मुंबईतील मलबार हिल येथे मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर शरद पवार यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचीत केली. “काल मी टीव्हीवर बघत होतो, त्यावेळी त्यांनी आमच्या विरोधी पक्षनेत्यांबद्दल आरोप केले होते. त्यांनी 40 मिनिटे भाषण केलं. तो त्यांचा अधिकार आहे. पण त्यानंतर त्यांना चक्कर आली. मला समजत नाही, तुम्ही 40 मिनिट भाषण करू शकता, मात्र त्यानंतर तुम्हाला चक्कर कशी येते?” असा प्रश्न शरद पवार यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर  केली.

यापूर्वी मला अशाप्रकारचे चित्र कधीही दिसलं नव्हतं. राज्य सरकारच्या धोरणाबद्दल लोकांनी राज्य प्रमुखांना विचारलं. सभेमध्ये तर तो लोकांचा अधिकार आहे. आम्हाला विचारतात त्याचे उत्तर देणे आपली जबाबदारी आहे. पण उत्तर देण्यासाठी आपल्याकडे काही नसलं, एक नवीन पद्धत निघाली आहे. विरोधकांनी किंवा लोकांनी प्रश्न विचारले तर लगेच, भारत माता की जय घोषणा देऊन असे वातावरण करून घोषणा द्यायच्या. यामुळे लोकांचा मूळ विषय दुसरीकडे करायचा किंवा शिवाजी महाराजांची आठवण करून द्यायचे. या सगळ्या गोष्टी हेच सांगतात की सत्ताधारी पक्षाला लोकांना सामोरे जायची अशी स्थिती नव्हती. लोकांच्या नाराजी संबंधात त्यांचे समाधान करण्याची त्यांच्याकडे शक्ती नव्हतीलोक बदल झाला पाहिजे या विचाराचे आहेत.” अशी टीकाही शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर  केली.

मला मतदानामध्ये सहभागी व्हायचा आनंद नेहमी असतो. अलीकडे गेल्या पाच वर्षात मी मुंबईत मतदान करतो आहे. माझं मतदान पूर्वी बारामतीत असायचे. आता मुंबईमध्ये मलबार हिलमध्ये आहे.” असेही ते म्हणाले.

शरद पवार यांना निवडणूक प्रचाराच्या उत्साहाबद्दल विचारले असता शरद पवार म्हणाले. “तुम्ही लोक पुन्हा पुन्हा मला माझ्या 80 वर्षे वयाच्या आठवण करुन देता, मी काय म्हातारा झालेला नाही. मला आठवत नाही मी किती सहभाग घेतले असतील. किती जिल्ह्यात गेलो असेल. पण सर्वत्र लोकांची भरपूर साथ आहे. रात्री दहा वाजता शेवटची बैठक संपते. त्यांनतर कोणत्याही प्रचाराला जाहीर परवानगी नसते. पण दहानंतर सुद्धा मी रात्री एक-दोन वाजेपर्यंत जागा असतो. ग्राऊंडवर एकंदर परिस्थिती समजून काही कमतरता असेल, काही लोकांना आवश्यकता असेल, तर त्या गोष्टी करत होतो. विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टींना सहकार्याची साथ होती.”

काँग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत येईल का? किती जागा मिळतील असा प्रश्न शरद पवार यांना विचारला असता शरद पवार म्हणाले. आम्हाला किती जागा मिळतील हे आता सांगता येणार नाही पण बहुमत मिळेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी समजल्या. सत्ताधारी लोकांना पाठिंबा नाही. त्यामुळे सत्ताधारी लोकांच्या हातून सत्ता जाणार याची जाण त्यांना झालेली दिसतेअसेही शरद पवार म्हणाले.

 

मागे

निवडणूक कर्तव्यावरील शिक्षकाचा गडचिरोलीत मृत्यू
निवडणूक कर्तव्यावरील शिक्षकाचा गडचिरोलीत मृत्यू

निवडणूक कर्तव्यावरील शिक्षकाचा भोवळ येऊन पडल्याने मृत्यु झाला आहे. एटापल्....

अधिक वाचा

पुढे  

मतदानाच्या धामधुमीत धनंजय मुंडेंच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर
मतदानाच्या धामधुमीत धनंजय मुंडेंच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर

राज्यभरात मतदानाची धावपळ आणि परळीतील राडेबाजीप्रकरण ताजं असताना, राष्ट्र....

Read more