ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवसेनेसोबत सत्तास्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात - शरद पवार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 20, 2019 12:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवसेनेसोबत सत्तास्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात - शरद पवार

शहर : मुंबई

शिवसेनेसोबत सत्तास्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आज किमान समान कार्यक्रम निश्चित होईल. सरकार स्थापनेबाबतची चर्चा 2-3 दिवसात संपेल, अशी एक्स्क्लुझिव्ह माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीव्ही 9 मराठीला दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आज संध्याकाळी दिल्लीत बैठक होत आहे. त्याआधी शरद पवार  हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून, महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळाची माहिती देणार आहेत.या सर्व घडामोडी घडत असताना, शरद पवारांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना, शिवसेनेसोबतच्या सत्तास्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं.

शरद पवार म्हणाले, “कोण काय बातम्या करतंय यावर मी बोलणार नाही, पण सध्या बातम्या कमी आणि अफवाच जास्त सुरू आहेत. आज नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. पुण्यात वसंतदादा पाटील शुगर इंटरनॅशनल कॉन्फरन्स होणार आहे. 22 देशातील लोक इथे येतील. याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांनी यावं, यासाठी नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यासाठी भेट घेत आहेराज्यातील ओल्या दुष्काळात झालेल्या नुकसानीबद्दल मदत मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे, असंही शरद पवारांनी सांगितलं.महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत शरद पवार म्हणाले, “आज काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांची किमान समान कार्यक्रमबाबत चर्चा होईल. तो रिपोर्ट आम्हाला देण्यात येणार आहे

 

 

मागे

"सावरकरांच्या 'भारतरत्न'ला नेहमीच विरोध करत राहणार" - खासदार हुसेन दलवाई

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची माग....

अधिक वाचा

पुढे  

महाराष्ट्रात दोन-तीन दिवसांत सत्ता स्थापन होण्याचे संकेत
महाराष्ट्रात दोन-तीन दिवसांत सत्ता स्थापन होण्याचे संकेत

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता महिना होईल, तरीही महाराष्ट्रात सत्ता स....

Read more