ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पत्रकारावर शरद पवार संतप्त ,काय होता तो प्रश्न ?

By SEJAL PURWAR | प्रकाशित: ऑगस्ट 31, 2019 03:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पत्रकारावर शरद पवार संतप्त ,काय होता तो प्रश्न ?

शहर : shrirampur

शुक्रवारी श्रीरामपूर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या संतापाचा बांध तुटला व त्याचा फटका एका पत्रकाराला सहन करावा लागला. जसे की, सध्याची परिस्थिती बघता राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमधील अनेक मोठ्या नेत्यांनी पक्षाला सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. दिवसेंदिवस पक्षातील नेत्यांची संख्या कमी होत असल्याने एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला, ‘दिवसेंदिवस पक्षातील नेते पक्ष सोडून जात आहेत. त्यात तुमचे नातेवाईक पद्मसिंह पाटील यांचा देखील समावेश आहे’, असा प्रश्न विचारताच शरद पवारांचा राग अनावर झाला व त्यांनी तुम्ही ‘माफी मागा अन्यथा चालते व्हा’ असे संगितले.

ते स्वत: देखील निघून जाण्याच्या तयारीत होते, नंतर वरिष्ठ पत्रकारांच्या मध्यस्थीनंतर या विषयावर पडदा टाकला गेला. यावेळी लोकशाहीत निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे व ते प्रत्येक व्यक्ती घेऊ शकतो, असे देखील शरद पवार म्हणाले. या ठिकाणी नातेवाईकांचा काय संबंध? आणि राजकारण आणि नेते मानून कोणी एकत्र येतं का? असा प्रतिसवाल त्यांनी केला असल्याचे दिसून येते॰

मागे

आदित्य ठाकरेंच ठरलयं ...
आदित्य ठाकरेंच ठरलयं ...

अनेक दिवसांपासून चालू असणार्‍या विधानसभा निवडणूकीच्या चर्चेमध्ये रोज नव....

अधिक वाचा

पुढे  

कुलभूषण जाधव केस : पाकिस्तान नरमला, भेटीला परवानगी
कुलभूषण जाधव केस : पाकिस्तान नरमला, भेटीला परवानगी

कुलभूषण जाधव केसच्या बाबाबतीत आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्याच्या निर्णाया....

Read more