ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शरद पवारांमुळे आम्हाला लढण्याची प्रेरणा मिळाली- हेमंत सोरेन

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 24, 2019 07:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शरद पवारांमुळे आम्हाला लढण्याची प्रेरणा मिळाली- हेमंत सोरेन

शहर : delhi

          नवी दिल्ली - आम्हाला शरद पवारांमुळे लढण्याची प्रेरणा मिळाली, असे वक्तव्य झारखंडचे भावी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केले आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) आघाडीने भाजपचा धुव्वा उडवला.


         यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हेमंत सोरेन यांचे अभिनंदन केले होते. शरद पवारांच्या या ट्विटला आज हेमंत सोरेन यांनी उत्तर दिले. त्यांनी म्हटले की, शरद पवारजी खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्रातील तुमच्या लढाईमुळे आम्हा सर्वांना प्रेरणा मिळाली, असे सोरेन यांनी म्हटले. 


         तत्पूर्वी शरद पवार यांनी कालच्या पत्रकारपरिषदेत झारखंडमुळे देशातील भगवी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे, असे वक्तव्य केले होते. भाजपने सत्ता आणि संपत्तीचा वापर करून झारखंड हातात ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आदिवासीबहुल लोकसंख्या असणाऱ्या झारखंडने तसे होऊन दिले नाही. यासाठी मी झारखंडच्या जनतेचे अभिनंदन करतो. 


      देशात अशीच परिस्थिती राहिली तर संधी मिळेल तेव्हा देशातील जनताही झारखंडचा कित्ता गिरवेल, असे शरद पवार यांनी सांगितले. हेमंत सोरेन हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री असतील. आघाडीचे प्रमुख म्हणून हेमंत सोरेन हे राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत सत्ता स्थापनेच दावा करतील. तसेच, अनेक औपचारिकतांनंतर सोरेन सरकार स्थापन होईल.
 

मागे

CAA मुळे  प्रत्येत भारतीयाला आनंद झाला पाहिजे - संभाजी बिडे
CAA मुळे प्रत्येत भारतीयाला आनंद झाला पाहिजे - संभाजी बिडे

            राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्याबाबत हिंदू समाज नपुंसक आहे असं ....

अधिक वाचा

पुढे  

अशी असणार ठाकरे सरकारची 'शिवभोजन' थाळी
अशी असणार ठाकरे सरकारची 'शिवभोजन' थाळी

          मुंबई - विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेने घोषणा केलेल्या १० रुपय....

Read more