ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चुकीला चुकीचं म्हटलं पाहिजे : शरद पवार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 25, 2019 04:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चुकीला चुकीचं म्हटलं पाहिजे : शरद पवार

शहर : सातारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज कराड दौऱ्यावर होते. माजी स्वर्गीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त पवारांनी प्रीतीसंगमावर जाऊन आदरांजली वाहिली. त्यानंतर शरद पवारांच्या हस्ते सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा  शुभारंभ झाला.यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. “ऊस उत्पादक शेतकरी उसावर अधिक लक्ष केंद्रित करण्याऐवजी बाकीच्या उद्योगावर लक्ष केंद्रित करतो ही चांगली गोष्ट आहेमुंबईला काय चाललं आहे कोण राहिला, कोण पळाला याची अखंड चर्चा सुरू असते. मात्र माझं ऊस टन उत्पादन वाढेल याची चर्चा करत नाही चर्चा दुसऱ्या विषयाचे होते, असा टोला शरद पवारांनी लगावला.जगात काय चाललंय तिकडं लक्ष असलं पाहिजे, चुकीला चुकीचं म्हटलं पाहिजे, हे सगळं करत असताना मूळ धंदा व्यवस्थित करावा, असा सल्ला शरद पवारांनी दिला.

शेतकऱ्याच्या एका मुलाने शेती, दुसऱ्याने उद्योग करावा

शेतीत संशोधन गरजेचं आहे, ऊस जात पीक, औजारे यामध्ये संशोधन सुरु आहे, उत्पादनाबरोबर अधिक किंमतीसाठी अभ्यास गरजेचा आहेशेतकऱ्यांच्या शेती सर्व मुलांनी करता, एकाने शेती करावी, तर दुसऱ्या मुलानं उद्योग किंवा इतर क्षेत्रात जावं, आता जमीन कमी होत आहे, लोकसंख्या वाढली आहे, शेतीजमीन कमी होते आहे, असा सल्ला शरद पवारांनी दिला.मी अधिक बोलण्यासाठी उभा नाही, माझी खूप बोलायची इच्छा आहे पण मुंबईत लोक माझी वाट पाहत आहे. त्यामुळं लवकर जायचं आहे. बाकीचं सगळं नीट करायचा आहे, ते नी नेटकं होईल. एकदा नीटनेटकं झाल्यानंतर जे काही घडेल ते घडेल, असं पवार म्हणाले.

अजित पवारांच्या बंडामागे माझा हात नाही : शरद पवार

भाजपला पाठिंबा देण्यामागे स्वतः शरद पवार यांचाच हात असल्याचा आरोपही यापैकीच एक . याविषयी विचारले असता शरद पवार यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली.

शरद पवार म्हणाले, “माझ्या पक्षातील सहकाऱ्यांना मी काही मुद्दे पटवून दिले तर ते माझं म्हणणं नाकारतात असा माझा अनुभव नाही. मला जर भाजपला पाठिंबा द्यायचा असता तर मी त्यांना सांगून पाठिंबा देऊ शकलो असतो. त्यामुळे भाजपला पाठिंबा देण्यात माझा हात आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही

मागे

मंत्रालयात गेलेले अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार न स्वीकारताच परतले
मंत्रालयात गेलेले अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार न स्वीकारताच परतले

राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीक....

अधिक वाचा

पुढे  

देवेंद्र फडणवीसांनी पदभार स्वीकारला, पहिली स्वाक्षरी कशावर?
देवेंद्र फडणवीसांनी पदभार स्वीकारला, पहिली स्वाक्षरी कशावर?

महाराष्ट्रात भाजपचे विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे बं....

Read more