By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 26, 2019 03:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं जोरदार मुसंडी मारली. राष्ट्रवादीनं तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. नेमका या निवडणुकीत कोणता फॅक्टर प्रभावी ठरला याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. तसंच त्यांनी राज ठाकरे आणि वंचितबद्दलही आपली भूमिका मांडली.
राज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणतात...
राज ठाकरेंच्या बाबतीत काय होतं की, त्यांना तरुण पिढीचा चांगला पाठिंबा आहे. परंतु, त्यांना पाठिंबा मिळाला असला तरी एक टीम तयार करावी लागेल. ती टीम उभी केल्यानंतर कुणाला मत द्यायचं हा एक विचार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, राज यांनी प्रभावीपणे भाषण केलं. पण, तुमच्या मतदारसंघात प्रतिनिधीच नसेल तर ते मतांमध्ये परिवर्तन होणार नाही. किंवा प्रभावी प्रतिनिधी दिला नाहीतर लोकं मतं देत नाही. परंतु, आता हळुहळु त्यांनी संघटनात्मक शक्ती वाढवण्याच्या कामाला दिसले आहे. त्याचा फायदा हा त्यांना 4-5 वर्षात नक्की दिसेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
'शिवसेनेला 50 टक्के सत्तेचा वाटा हवा'
भाजप आणि शिवसेनेत काय ठरलं हे माहित नाही. मात्र, आता उद्धव ठाकरेंना सत्तेत पन्नास टक्के सहभाग हवाय. त्यामुळं सत्तेतील समान वाटणीसाठी उद्धव ठाकरे आक्रमक झाल्याचं शरद पवार म्हणाले.
वंचित आणि एमआयएमचा पराभव का?
एमआयएम आणि वंचित आघाडीसाठी मुस्लिम मतदारांचा मोठा टक्का होता. परंतु, नंतरच्या काळात एमआयएम बाहेर पडली. पण त्यांच्याबद्दल चर्चा केल्यावर एक स्पष्ट झालं की, आपण इथं जिंकू शकत नाही. इथं आपल्याला भाजप आणि शिवसेनाला पराभूत करायचं आहे. पण, तसं झालं नाही, त्याच्या या निर्णयामुळे भाजपलाच फायदा झाला, असंही पवारांनी सांगितलं.
सत्ता स्थापन करणार का?
लोकांनी आम्हाला सत्तेसाठी जनमत दिलेले नाही. त्यामुळं आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करणार नसल्याचं शरद पवारांनी सांगितलंय. प्रबळ विरोधक म्हणून काम करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात बसणार आहे. तसंच राष्ट्रवादी सक....
अधिक वाचा