By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 19, 2019 05:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभूत झालेल्या कॉंग्रेसने यावेळी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी कंबर कसल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेसकडे सध्याच्या घडीला प्रभावी वक्ता नाही. त्याचबरोबर महाराष्ट्रात प्रभाव असलेला नेताही नाही. त्यामुळे कोंग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील नेते या निवडणुकीत प्रचारासाठी उतरण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रचारासाठी आपली हुकूमाची पाने बाहेर काढली आहेत. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या महाराष्ट्रात 20 रॅली होणार आहेत. शिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रियंका गांधी यांची एकत्र प्रचारसभा होणार आहे.
कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रत्येकी 125-125 आणि मित्रपक्ष 38 असे आघाडीचे जागा वाटप ठरले आहे. त्यामुळे कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांची एकत्र सभा आयोजित करण्यात आली आहे. प्रियंका गांधी आणि शरद पवार या निमिताने प्रथमच एक रॅलीमध्ये एकत्र दिसणार आहेत. याशिवाय विदर्भात यवतमाळ नागपूर जिल्ह्यात मराठवाड्याच्या दोन जिल्ह्यात तर खांदेशात तीन ठिकाणी रॅली होणार आहे.
सोनिया गांधी महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नंदुरबार, औरंगाबाद, बीडमध्ये सभा घेणार आहेत. तर राहुल गांधी यांच्या विदर्भ, मराठवाडा, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र , जळगावमध्ये सभा होणार आहेत. निवडणूकांच्या तारखांची घोषणा झाल्यावर कॉंग्रेसच्या या नेत्यांच्या सभांच्या तारखा जाहिर करण्यात येणार आहे.
शत्रूला धूळ चारण्याची क्षमता असलेल्या स्वदेशी बनावटीच्या हलक्या 'तेजस' ....
अधिक वाचा