ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शरद पवारांनी सीबीआय चौकशीबाबत घेतलेली भूमिका योग्य : देवेंद्र फडणवीस

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2020 09:18 AM 2019-02-12T14:15:30+5:30

शरद पवारांनी सीबीआय चौकशीबाबत घेतलेली भूमिका योग्य : देवेंद्र फडणवीस

शहर : मुंबई

आजोबा आणि नातवामधील वाद आहे. यामध्ये आजोबांनी नातवाला किंवा नातवाने आजोबांना किंमत द्यायची की नाही हे त्यांचं त्यांनी ठरवायचं आहे. हा त्यांच्या घरातील प्रश्न आहे. परंतु त्यांनी सुशांतसिंग राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशी करण्या बाबत माझी काही हरकत नाही, असं स्पष्ट केलं आहे. ही भूमिका नक्कीच योग्य आहे असं मत विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दहिसर चेक नाका येथे कोविड सेंटरला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी प्रविण दरेकर देखील उपस्थित होते.

प्रविण दरेकर म्हणाले, कुटुंबात संघर्ष आहे अशी चर्चा आहे. यामध्ये तथ्य वाटतंय. शेवटी नातवाला किंमत द्यायची की नाही हा आजोबांचा प्रश्न आहे. परंतु शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे की, माझी सीबीआय चौकशीला हरकत नाही. यावरून त्यांनी पार्थ पवार यांच्या मागणीला किंमत दिल्याचं दिसतंय. यासोबत पार्थ पवार यांना त्यांनी इमॅच्युअर म्हटलं आहे याचा अर्थ असा की, राष्ट्रवादी पक्षात अशा अपरिपक्व नेत्यांना लोकसभेची तिकिटं देण्यात येतात. शेवटी पार्थ पवार हे एक युवा नेतृत्व आहे. त्यांचं असं खच्चीकरण होणं योग्य नाही.

काय म्हणाले शरद पवार?

पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली होती. तशा आशयाचं पत्र त्यांनी गृहमंत्र्यांना दिलं होतं. यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. याविषयी शरद पवार म्हणाले की, "माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही. त्यांचं वक्तव्य इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशी कोणाला करायची असेल, तर माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. पण कोणाला सीबीआय चौकशीची मागणी करायची असेल त्यासाठी कोणाचा विरोध नसावा."

मागे

मंत्रिमंडळ बैठकीतील 7 मोठे निर्णय
मंत्रिमंडळ बैठकीतील 7 मोठे निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकी....

अधिक वाचा

पुढे  

करदात्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा, जाहीर केली नवी करप्रणाली
करदात्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा, जाहीर केली नवी करप्रणाली

प्रामाणिक करदात्यांसाठी मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. पंतप्रधान नरें....

Read more