ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवसेना-भाजपामध्ये सत्तासंघर्ष सुरू असताना शरद पवार शेतकऱ्यांच्या भेटीला

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 01, 2019 02:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवसेना-भाजपामध्ये सत्तासंघर्ष सुरू असताना शरद पवार शेतकऱ्यांच्या भेटीला

शहर : मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहेत. अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे नाशिक जिल्ह्यात शेतीचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. नाशिककडे जाताना घोटी गावाजवळ शेताच्या बांधावर जात शरद पवारांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. तसंच नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर शरद पवार नाशिककडे रवाना झाले.

'आमच्या हातचं पीक गेलंय, खूप नुकसान झालंय, जगावं की मरावं असा प्रश्न आमच्या समोर आहे. मात्र सरकारतर्फे कुणीच आलेलं नाही', अशी व्यथा या शेतकऱ्यांनी आपल्याजवळ व्यक्त केल्याचंही पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. 

जिल्ह्यातील तब्बल तीन लाख हेक्टरहून अधिक म्हणजेच जवळपास निम्म्या क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झालं आहे. यामध्ये लेट खरीप कांदा, मका, द्राक्ष, सोयाबीनचा समावेश आहे. जिल्ह्यातल्या १ हजार ६१४ गावांमधले ४ लाख ५२ हजार ९३१ शेतकरी बाधीत झाले आहेत.

एकीकडे, शिवसेना-भाजपामध्ये सत्तासंघर्ष सुरू असताना राष्ट्रवादीनं मात्र 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतलीय. दरम्यान, येत्या ५ नोव्हेंबर किंवा ६ नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर भाजपा मंत्रीमंडळाचा शपथविधी समारंभ पार पडणार असल्याची माहिती शासनातील वरिष्ठ सूत्रांकडून मिळतेय. शिवसेना पुढे आली तर 'सोबत' नाहीतर शिवसेने'शिवाय' भाजपा एकट्यानंच शपथविधी करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

मागे

तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट; भाजपकडून शिवसेनेला इशारा
तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट; भाजपकडून शिवसेनेला इशारा

वेळ पडल्यास आम्ही आवश्यक बहुमताची जुळवाजुळव करू सरकार स्थापन करू, असा इशार....

अधिक वाचा

पुढे  

मुख्यमंत्रीपदाचा हट्ट शिवसेना सोडणार
मुख्यमंत्रीपदाचा हट्ट शिवसेना सोडणार

जसजशी 9 नोव्हेंबर ही तारीख जवळ जवळ येऊ लागली तस तशी राजकीय नेत्यांची धावपळ स....

Read more