By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: नोव्हेंबर 07, 2019 05:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्रात इतर भागातील चक्रीवादळामुळे वातावरणात अचानक बदल होत आहेत, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणातही चक्रीवादळं आल्यासारखे बदल पाहायला मिळत आहेत, आता काही वेळापूर्वी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली. यात शिवसेना आणि भाजप यांचं सूत अजूनही जुळत नसल्याचं दिसून येत आहे.
शरद पवार अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणकडे रवाना झाले होते, त्यांनी आपला कोकण दौरा अर्ध्यात सोडून, ते मुंबईकडे रवाना झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. सत्तास्थापन करण्याचा दावा करण्यासाठी उद्याचा दिवस शिल्लक आहे. शिवसेनेशिवाय सत्तास्थापन करण्याचा दावा भाजप करत नसेल तर शिवसेना ही जबाबदारी राष्ट्रवादी तसेच काँग्रेसला सोबत घेऊन पार पाडेल का? याकडे लक्ष लागून आहे.
यातच शरद पवार यांनी आपला कोकण दौरा अर्ध्यात सोडून मुंबईकडे ते रवाना होत असल्याची चर्चा असल्याने राज्यातील सत्तासंघर्षात चक्रीवादळ आल्यासारखी परिस्थिती निर्माण होणार आहे.
'लवकरच गोड बातमी मिळेल', असं मावळते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बु....
अधिक वाचा