By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 28, 2019 02:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : panvel
लोकसभा निवडणूकीचा शेवटच्या टप्प्यातील प्रचार आचारसंहितेनुसार थांबला. राजकीय पक्षाकडून छुप्या रितीने याचे आचारसंहितेचे उल्लंघन केले जात आहे. एवढेच नव्हे तर पैशाची प्रलोभने देऊन मते विकत घेण्याचा प्रयत्न होत आहे. असाच एक प्रकार पनवेलमध्ये समोर आला. मतदारांना पैसे वाटप करताना शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. प्रताप आरेकर असे या कार्यकर्त्याचे नाव असून तो सुकापूर शहराचा सरचिटणीस आहे. कार्यकर्त्याला रंगेहात अटक लोकसभा निवडणुकीमध्ये पनवेल शहरात पैसे वाटपाची प्रकरणे चांगलीच गाजत आहेत. एका मतासाठी 200 रुपयांपासून 400 रुपयांपर्यंत भाव सुरू आहे. काल कामोठेत दोन शेकाप कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना अटक केली होती. त्यानंतर, आज परत एकदा शेकापच्याच कार्यकर्त्याला अटक झाली आहे. प्रताप आरेकरला अटक होताच त्याच्या सोबत असलेले कार्यकर्ते पळून गेले. आपण पकडलो गेलो आहोत हे समजताच आरेकरने पैशांची पिशवी बाजूच्या लाँड्रीत फेकून दिली. या पिशवीत एकूण 29 पाकिटे आढळून आली आहेत. प्रत्येक पाकिटात 220 रुपये सापडले. अशा गैरप्रकाराला आळा घालण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान उद्या होणार आहे. चौथ्या टप्पा ह....
अधिक वाचा