By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 18, 2020 12:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
कृषीविषयक विधेयक मंजूर करणाऱ्या केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला (Modi Government) मोठा धक्का बसला. शेतकऱ्यांपासून ते संसदेपर्यंत या विधेयकाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे. केंद्रीय मंत्री आणि शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल (Harsimrat Kaur Badal) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसे ट्विट त्यांनी केले आणि त्यानंतर चार पानी राजीनामा पत्र पाठवून मोदी सरकारला लक्ष्य केले. दरम्यान, हरसिमरत कौर बादल यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.
पत्रात त्यांनी काय म्हटलंय?
- शिरोमणी अकाली दलाने वारंवार विनंती करूनही केंद्र सरकारने या विधेयकांबाबत शेतकऱ्यांना विश्वासात घेतलेले नाही.
- शेतकऱ्यांच्या हिताच्या रक्षणाची आमच्या पक्षाची परंपरा आहे.
- पक्षाचा प्रत्येक सदस्य शेतकरी आहे.
- तीन्ही विधेयके शेतकऱ्यांचे नुकसान करणारी आहेत.
- शेतकऱ्यांची बहीण, कन्या म्हणून त्यांच्या पाठिशी उभे राहिल्याचा मला अभिमान आहे. मी शेतकऱ्यांसोबत आहे.
तीन विधेयक संसदेत मंजूर
- पहिलं विधेयक - कृषी क्षेत्र खुले करणारी शेतकरी उत्पादने व्यापार आणि वाणिज्य
- दुसरे विधेयक - शेतकरी किंमत हमी आणि कृषी सेवा करार
- तिसरे विधेयक - अत्यावश्यक वस्तू
५० वर्षांचे काम संपवत असल्याची भीती – सुखबीर
शिरोमणी अकाली दलाचा एनडीएमध्ये हरसिमरत कौर बादल या एकमेव मंत्री होत्या. शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी लोकसभेमध्ये हरसिमरत कौर बादल यांच्या राजीनाम्याबाबत सांगितले. अकाली दल एनडीएमधला भाजपचा सगळ्यात जुना साथीदार आहे. दरम्यान, पंजाबच्या शेतकऱ्यांनी अन्नधान्याच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भर करण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. पंजाबमध्ये सरकारने शेतीवर आधारित ढाचा तयार करण्यासाठीचे कठीण काम केले, पण हा अध्यादेश आपल्या ५० वर्षांचे काम संपवत असल्याची भीती सुखबीर सिंग बादल यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या वाढदिवशी मोठा झटका बसला आहे. मोदी मंत्....
अधिक वाचा