By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 26, 2019 08:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जल्लोष करतायत. मुंबईत हॉटेल ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीची बैठक होत आहे. या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्याची निवड केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह तीनही पक्षाचे सर्व नेते उपस्थित झाले आहेत. मात्र या बैठकीला अजित पवार उपस्थित असतील असं म्हटलं जात असलं तरी अजित पवार येथे येणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.
यावेळी हॉटेल ट्रायडंटबाहेर कार्यकर्ते जमले आहेत, सत्तास्थापनेच्या या सत्तासंघर्षात अनेक वेगवेगळी वळणं आली, आश्चर्यकारक राजकीय घटना घडल्या. यामुळे सर्वच पक्षाचे कार्यकर्ते मनापासून प्रत्येक घडामोडीवर चर्चा करत होते.अखेर मुख्यमंत्रीपद एवढ्या अडथळीच्या शर्यतीनंतर शिवसेनेच्या वाटेला जाणार असल्याने, शिवसैनिकांमध्ये देखील अनोखा उत्साह दिसून येत आहे. ट्रायडंट हॉटेलचा परिसर, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी दणाणून टाकला आहे.
दादर येथील शिवाजी पार्कवर १ डिसेंबरला मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होणार आहे.....
अधिक वाचा