By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 28, 2019 11:12 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु असताना आता शिवसेना आणि भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची आणखी एक बातमी समोर आली आहे. भाजप शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करण्याच्या विचारात असल्याचीही माहिती नुकतीच समोर आली होती. यानंतर सोमवारी शिवसेना आणि भाजपचे नेते स्वतंत्रपणे राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते १०.३० वाजता राज्यपालांना भेटतील. तर ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे सत्तास्थापनेच्या हालचाली करत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, ही भेट केवळ परस्परांवरील दबाव वाढवण्यासाठी असल्याचे राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. याचा अंदाज आल्यामुळे शिवसेनेने सत्तेच्या समसमान वाटपाचा आग्रह धरला आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपनेही वेगळे पर्याय आजमवयाला सुरुवात केली होती. शिवसेनेचा सध्याचा रागरंग पाहता विधानसभेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपकडून एकट्यानेच सत्तास्थापनेसाठी पुढाकार घेतला जाऊ शकतो. २०१४ प्रमाणेच लवकरच सरकार स्थापना केली जाईल, अशी शक्यता आहे. त्यासाठी भाजपने फ्लोअर टेस्टला जाण्याची तयारीही सुरू केल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी ३१ तारखेचा मुहूर्त ठरल्याचे सांगितले जाते.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या काही जागा घटल्याने मित्रपक्ष असलेल्....
अधिक वाचा