ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भुजबळांच्या विरोधात शिवसैनिकांची बॅनरबाजी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 26, 2019 02:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भुजबळांच्या विरोधात शिवसैनिकांची बॅनरबाजी

शहर : मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेत जाणार नसल्याचे कालच जाहीर केले होते. तथापि तेही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या अफवा पसरता कट्टर शिवसैनिक सक्रिय झाले, त्यांनी ताबडतोब भुजबळांविरोधात बॅनरबाजी सुरू केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिव आहेर यांनी का शिवसेनेत प्रवेश करता छगन भुजबळही शिवसेनेत जाणार, अशी चर्चा सुरू झाली. तथापि, छगन भुजबळ यांनी या अफवांचे खंडन केले, तरी काही कट्टर शिवसैनिकांनी भुजबळांच्या कथित शिवसेनेतील प्रवेशांला विरोध सुरू केला. विक्रोळी येथील शिवसैनिक रवींद्र तिवारी यांनी “शिवसेना” भवनासमोर “मातोश्री” समोर आणि शहरातील सर्वच प्रमुख चौकात भुजबळांच्या विरोधात बॅनर लावले. या बॅनरवर भुजबळ यांचे कार्टून असून त्यांना “लखोबा लोखंडे” असे संबोधले आहे साहेबांना दिलेला त्रास महाराष्ट्रातील जनता विसरू शकत नाही आपण आहे तिथेच राहा असा संदेशही देण्यात आला आहे.

 

मागे

भाजपचे खासदार अर्जुन सिंह यांच्या घरावर बॉम्ब हल्ला
भाजपचे खासदार अर्जुन सिंह यांच्या घरावर बॉम्ब हल्ला

उत्तर 24 परगणा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे खासदार अर्जुन सिंह यांच्या घरा....

अधिक वाचा

पुढे  

इस्त्राईलमध्ये राजकीय प्रचारासाठी नरेंद्र मोदी
इस्त्राईलमध्ये राजकीय प्रचारासाठी नरेंद्र मोदी

भारतासह जागतिक पातळीवर आपला ठसा उमटविणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच....

Read more