ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवसेना - भाजपची मुंबईत सोमवारी बैठक, सीएम वादावर बैठकीला महत्व

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 23, 2019 12:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवसेना - भाजपची मुंबईत सोमवारी बैठक, सीएम वादावर बैठकीला महत्व

शहर : मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचं ठरले आहे, असे सांगितले असले तरी भाजप शिवसेनेत मोठा भाऊ आणि छोटा भाऊ कोण याचा वाद काही मिटलेला नाही. मुख्यमंत्री कोणाचा याच्यावर जोरदार चर्चा होत आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी भाजपचाच मुख्यमंत्री असेल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदावरुन तणाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा वाद भाजपसाठी डोकेदुखी ठरु शकते. तसेच विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी शिवसेना-भाजपची सोमवारी मुंबईत बैठक होत आहे.

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच मोठा भाऊ असून भाजपाचच मुख्यमंत्री होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तर आमचे ठरले दुसऱ्यांनी त्यात नाक खूपसू नये, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाजनांना लगावला. दुसरीकडे दानवेंनी मात्र आमचं ठरलेलं आम्ही सांगणार नाही, असं सांगत युतीचं जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदाबाबत सस्पेंन्स निर्माण केला आहे. असे असले तरी भाजप आणि शिवसेना विधानसभेतही एकत्र लढणार असून लोकसभा निवडणुकीपेक्षा मोठा विजय मिळवणार असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी केली असून अब की बार २२० पार, फिर एक बार शिवशाही सरकार अशी घोषणाच भाजपानं दिलीय. विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेनेनं २२० जागांचं लक्ष्य ठेवल्याचं भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री राज्यात यात्रा काढणार असून सरकारनं केलेल्या विकासाच्या जोरावर मतं मागणार असल्याचं पाटील यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे भाजपमध्ये चैतन्याचं वातावरण असून याच अनुकूल वातावरणाचा लाभ उठवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. दरम्यान १५ सप्टेंबरच्या आसपास विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय १५ ते २० ऑक्टोबरदरम्यान विधानसभेसाठी मतदान होईल असंही ते म्हणालेत.

मागे

भाजपचं महाराष्ट्रात 'अब की बार २२० पार'
भाजपचं महाराष्ट्रात 'अब की बार २२० पार'

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं तयारी सुरु केली आहे. अब की बार २२० पार, फिर एक ....

अधिक वाचा

पुढे  

युतीत खडा टाकणाऱ्यांवर कारवाई करा, उद्धव ठाकरे अमित शाहंना पत्र पाठवणार
युतीत खडा टाकणाऱ्यांवर कारवाई करा, उद्धव ठाकरे अमित शाहंना पत्र पाठवणार

भाजपा-शिवसेना युतीमध्ये खडा टाकणा-यांवर आता शिस्तभंगाची कारवाई होणार असल्....

Read more