ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक, महाविकासआघाडीवर शिक्कामोर्तब

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 22, 2019 06:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक, महाविकासआघाडीवर शिक्कामोर्तब

शहर : मुंबई

राज्याच्या सत्तास्थापनेच्या दृष्टीने मुंबईत सर्वात महत्त्वाची बैठक झाली. नेहरु सेंटरमधील या बैठकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांचे सर्व दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे केंद्रातील नेते मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, के सी वेणुगोपाल या सर्वांनी पहिल्यांदाच एकत्र बसून चर्चा केली. या बैठकीत महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवर शिक्कामोर्तब करण्यात येणार हे निश्चित होतं.

या बैठकीला दुपारी 4 वाजून 40 मिनिटांनी सुरुवात झाली.

महासेनाआघाडीच्या बैठकीला कोण कोण उपस्थित?

शिवसेनेकडूनउद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, संजय राऊत, सुभाष देसाई

राष्ट्रवादी –  शरद पवार, अजित पवार, प्रफुल पटेल, जयंत पाटील, नवाब मलिक

काँग्रेसअहमद पटेल,पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, बाळासाहेब थोरात, मल्लिकार्जुन खर्गे, के सी वेणुगोपाल

 विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून जवळपास एक महिना पूर्ण होत आला. गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींनी वेग पकडलेला दिसत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक झाल्यानंतर आज मुंबईत तीनही पक्षांच्या नेत्यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली.काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं अभूतपूर्वमहासेनाआघाडी सरकार दृष्टीक्षेपात असून आजच्या दिवसात बैठका आणि चर्चांच्या अखेरीस अंतिम निर्णय हाती येणार हे निश्चित होतं.

 

 

मागे

भाजपने शिवसेनेला दगा दिला - उद्धव ठाकरे
भाजपने शिवसेनेला दगा दिला - उद्धव ठाकरे

भाजपने शिवसेनेला दगा दिला आहे, असा थेट आरोप आमदारांच्या बैठकीत पक्षप्रमुख ....

अधिक वाचा

पुढे  

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्याच्या राजकारण....

Read more