ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बहुमताचा १४५ चा आकडा गाठण्यासाठी शिवसेनेकडून वेगवान हालचाली

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 11, 2019 10:07 AM 2019-02-12T14:15:30+5:30

बहुमताचा १४५ चा आकडा गाठण्यासाठी शिवसेनेकडून वेगवान हालचाली

शहर : मुंबई

मढ आयलंडच्या 'द रिट्रीट हॉटेल'मध्ये असलेल्या शिवसेना आमदारांना सोमवारी सकाळी लवकर उठून तयार राहण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या दिवसभरात मुंबईत मोठ्या राजकीय हालचाली घडण्याचे संकेत मिळत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्या सकाळी साधारण साडेनऊच्या सुमारास हॉटेल रिट्रीटमध्येच आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक होईल. या बैठकीला आदित्य ठाकरे उपस्थित असतील. यानंतर सत्तास्थापनेच्यादृष्टीने संख्याबळ दाखवण्यासाठी शिवसेनेचे नेते या आमदारांना घेऊन दुपारच्या सुमारास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊ शकतात. तसेच जयपूरमध्ये असलेले काँग्रेसचे आमदारही आज रात्री किंवा उद्या मुंबईत परततील. बहुमताचा १४५ चा आकडा गाठण्यासाठी शिवसेनेकडून या हालचाली सुरु असल्याचे सांगितले जाते.

भाजपने सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवडणुकीतील दुसरा मोठा पक्ष असणाऱ्या शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी विचारणा केली आहे. त्यानुसार शिवसेनेला सोमवारी रात्री आठ वाजेपर्यंत राज्यपालांसमोर बहुमताची आकडेवारी सादर करावी लागेल.

शिवसेनेकडे सत्तास्थापनेसाठीचे बहुमत असल्याची खात्री पटल्यानंतरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्यांना सत्तास्थापनेचे निमंत्रण देतील. अन्यथा राज्यपाल वेगळ्या पर्यायाचा विचार करतील, असे सांगितले जात आहे.

मागे

शिवसेना 'एनडीए'तून बाहेर पडणार
शिवसेना 'एनडीए'तून बाहेर पडणार

भाजपने सत्तास्थापन करायला नकार दिल्यानंतर मुंबईतील राजकीय हालचालींना कमा....

अधिक वाचा

पुढे  

आघाडीसोबत शिवसेना स्थिर सरकार देणार- संजय राऊत
आघाडीसोबत शिवसेना स्थिर सरकार देणार- संजय राऊत

आघाडीसोबत शिवसेना स्थिर सरकार देणार असून शेतकरी, शिक्षण, रोजगार अशा मुद्द्....

Read more