By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2019 12:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी भाजप आणि शिवसेनेला घरचा अहेर दिलाय. भाजप आणि शिवसेनेचे नेते 220 ते 230 जागा मिळतील असा दावा करत असताना मनोहर जोशी यांनी मात्र एवढ्या जागा मिळणार नाहीत असं म्हटलंय. महायुती 200 जागा पार करणार नाही असं मला वाटतं असंही जोशी यांनी सांगितलं. कुठला नेता दावा करतोय त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत असंही ते म्हणाले. मी पक्षनेतृत्वाविरुद्ध कधीच जात नाही, मी पक्ष शिस्त पाळणारा शिवसैनिक आहे त्यामुळे शिवसेनेचाच मुख्यमंत्री येणार असंही ते म्हणाले. शरद पवार आणि माझे संबंध चांगले असले तरी ते करत असलेल्या सर्वच गोष्टी योग्य आहेत असं नाही असंही ते म्हणाले. आदित्य ठाकरे एक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आणि शिवसेनेतही महत्त्वाची भूमिका स्वीकारतील असंही त्यांनी सांगितलं.
जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं यासाठी आयोगाने अनेक उपक्रम राबवले आहेत. मुंबईतल्या भायखळा इथलं मतदान केंद्र रांगोळ्या आणि फुग्यांनी सजविण्यात आलंय. मतदान केंद्रबाहेर अतीशय सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. तर मतदान केंद्राच्या प्रवेश व्दारावर फुग्यांची सजावट करण्यात आलीय. तर विदर्भातल्या यवतमाळमध्ये मतदारांचं औक्षण करण्यात आलंय. महिला मतदारासाठी सखी मतदान केंद्र आहे त्याला ही सजवण्यात आल आहे. त्यामुळे हे मतदान केंद्र मतदारांचं आकर्षण ठरलं आहे. राज्यातल्या अनेक शहरांमध्येही अशाच प्रकारे मतदानकेंद्र सजविण्यात आले आहेत.
करमाळ्यात मतदानला गालबोट लागलंय. अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्या कार्यकर....
अधिक वाचा