ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाविकास आघाडीतील समन्वयासाठी सुकाणू समिती स्थापन करणार - संजय राऊत

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 02, 2020 11:59 AM 2019-02-12T14:15:30+5:30

महाविकास आघाडीतील समन्वयासाठी सुकाणू समिती स्थापन करणार - संजय राऊत

शहर : मुंबई

       मुंबई - मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता खातेवाटपाचा निर्णयही लांबत चालला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन तीन दिवस लोटले तरी खातेवाटप करण्यात आलेली नाही. खातेवाटपावरून महाविकास आघाडीत कुरबूरी सुरू असल्याच्या चर्चा सुरू असल्याच्या चर्चांनी वेग धरला आहे. त्यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी खुलासा केला आहे. 


      राऊत म्हणाले, “खातेवाटपावरून महाविकास आघाडीत कोणतीही कुरबूर नाही. तिन्ही पक्षांमध्ये खातेवाटप झालेलं आहे. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांकडून विलंब झालेला नाही. आज सायंकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होईल,” अशी माहिती राऊत यांनी दिली.


       मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महिनाभरानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यानंतर खातेवाटपसंदर्भातही विलंब होत असल्यानं महाविकास आघाडीत खातेवाटपावरून कुरबुरी सुरू असल्याचं राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चेला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे. 


     राऊत म्हणाले, “महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये संवाद राहावा. अनेक मुद्यांवर चर्चा व्हावी म्हणून शरद पवार यांनी सुकाणू समिती स्थापन करण्याची सूचना केली होती. या समितीतील तिन्ही पक्षाचे नेते भेटत असतात. खातेवाटपावरून कोणतीही कुरबूर नाही. तिन्ही पक्षांमध्ये आधीच खातेवाटप झालेलं आहे. पक्षातंर्गत खातेवाटपाचा प्रश्न शिल्लक होता. तोही जवळपास सुटला आहे. 
 

मागे

मंत्रीमंडळातील नवनिर्वाचित काँग्रेस मंत्री यांची सोनिया गांधींशी भेट
मंत्रीमंडळातील नवनिर्वाचित काँग्रेस मंत्री यांची सोनिया गांधींशी भेट

       नवी दिल्ली - राज्यात मंत्रिमंडळ विस्तारानंतर नवनिर्वाचित काँग्र....

अधिक वाचा

पुढे  

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डी. पी. त्रिपाठी यांचं निधन 
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डी. पी. त्रिपाठी यांचं निधन 

        नवी दिल्ली -  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खा....

Read more