ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'तुम मुझे व्होट दो,हम तुम्हे व्हॅक्सीन देगें' हा भाजपचा नारा;देशात फूट पाडण्याचा प्रयत्न- संजय राऊत

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 23, 2020 10:42 AM 2019-02-12T14:15:30+5:30

'तुम मुझे व्होट दो,हम तुम्हे व्हॅक्सीन देगें' हा भाजपचा नारा;देशात फूट पाडण्याचा प्रयत्न- संजय राऊत

शहर : मुंबई

कोरोनाची लस केवळ भाजपशासित राज्यांमधील नागरिकांनाच मोफत मिळणार का, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला. आम्ही शाळेत असताना पाठ्यपुस्तकाततुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा अशी घोषणा वाचली होती. त्याप्रमाणाचे आता भाजपतुम मुझे व्होट दो, हम तुम्हे व्हॅक्सीन देगें असा नारा देत असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला.

भाजपकडून गुरुवारी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. यामध्ये आमची सत्ता आल्यास बिहारमधील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची मोफत लस देऊ, असे आश्वासन देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपला खडे बोल सुनावले. यापूर्वी जातीधर्माच्या मुद्द्यावरून देशात दुही माजवण्याचा प्रयत्न झाला. आता भाजपला लसीच्या मुद्द्यावरून देशाचे विभाजन करण्याची तयारी सुरु आहे का, असे राऊत यांनी विचारले.

भाजपला मत देणाऱ्यांना कोरोनाची लस देणार नाही, अशाप्रकारचे राजकारण क्रुरता आहे. मध्य प्रदेशातही भाजप नेत्यांकडून अशी वक्तव्ये केली जात आहेत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा डागाळत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. त्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि जे.पी. नड्डा यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस मोफत मिळणार किंवा नाही, हे स्पष्ट करावे, असेही राऊत यांनी म्हटले.

केंद्र सरकारने सर्व राज्यांना समान वागणूक द्यायला नको का?’

बिहार विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने मतदारांना कोरोनाची मोफत लस देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आता राजकारण तापले आहे. याचा अर्थ भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांतील लोकांना कोरोनाची लस मिळणार नाही का, असा सवाल शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी उपस्थित केला होता. कोरोनाची लस अजून आली नाही तरीही भाजपकडून त्याचा निवडणूक प्रचारासाठी वापर केला जात आहे. कोरोनाच्या लसीच्या वाटपासंदर्भात केंद्र सरकारने सर्व राज्यांना समान वागणूक द्यायला हवी, असे प्रियंका चतुर्वेदी यांनी सांगितले.

मागे

CBI च्या क्षमतेवर शंका नाही, पण राजकीय हस्तक्षेपामुळे महाराष्ट्रात नो एण्ट्री : गृहमंत्री
CBI च्या क्षमतेवर शंका नाही, पण राजकीय हस्तक्षेपामुळे महाराष्ट्रात नो एण्ट्री : गृहमंत्री

सीबीआय ही अत्यंत प्रोफेशनली काम करणारी संस्था आहे, पण त्यांचा वापर राजकीय प....

अधिक वाचा

पुढे  

महाविकास आघाडीत तणाव! शिवसेना आमदाराचा राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव
महाविकास आघाडीत तणाव! शिवसेना आमदाराचा राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव

कोकणात महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. शिवसेनेचे आमदार आणि र....

Read more